Ichalkaranji Lok Sabha constituency candidate Haji Aslam Syed filed a rape case 
कोल्हापूर

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांच्यावर बलत्काराचा गुन्हा...

अभिजित कुलकर्णी

नागाव (कोल्हापूर) : इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलत्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली होती. मंगळवारी (  २८ जुलै ) रोजी या महिलेने शिरोली एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत अत्यंत गोपनीयता ठेवत माध्यमांपासूनही ही माहिती लपवली.


तक्रारदार महिलेने म्हटले आहे की,

हाजी असलम सय्यद आणि आपली एका क्कारंन्टाईल सेंटरमध्ये भेट झाली होती. त्याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी संबंध ठेवले. पतीचे निधन झालेले असल्यामुळे मीही असलम वर विश्वास ठेवला असे या महिलेने सांगितले. नंतर मात्र त्याने जबाबदारी झटकली. यामुळे शिरोलीत राहणार्‍या या महिलेला धक्का बसला. आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. हाजी असलम याची यापूर्वी आणखीन चार लग्न झाल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलेने केली आहे.


दरम्यान हाजी असलम याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे. हाजी असलम सय्यद याने २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून वंचित आघाडी कडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना चांगली मतेही मिळाली होती.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT