Ichalkaranji MLA Prakash Awade esakal
कोल्हापूर

हाळवणकरांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आमदार आवाडे BJP मध्ये करणार प्रवेश? सुपुत्राला मिळणार विधानसभेचं तिकीट?

Ichalkaranji MLA Prakash Awade : आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांचा भाजप (BJP) प्रवेश निश्‍चित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आमदार आवाडे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून सुरेश हाळवणकर यांची ओळख आहे. या दोघांमधील राजकीय संघर्ष वस्त्रनगरीने पाहिला आहे.

इचलकरंजी : येथील आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांचा भाजप (BJP) प्रवेश निश्‍चित झाला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आज त्यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) दुपारी ३ वाजता कोल्हापुरातील महासैनिक दरबार हाॅलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात आमदार आवाडे यांच्यासह त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचा प्रवेश होणार आहे.

काल रात्री उशिरा याबाबतच्या हालचालींना वेग आला. काँग्रेसचे (Congress) निष्ठावंत घराणे म्हणून आवाडे यांची ओळख होती, मात्र गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसला रामराम करीत गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामध्ये भाजपचे विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर लगेचच त्यांनी विधानसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला.

गेली पाच वर्षे ते भाजप प्रवेशासाठी उत्सुक होते. अनेकवेळा चर्चा होत राहिली, मात्र त्यांच्या प्रवेश सातत्याने लांबणीवर पडत गेला. अलीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे ते शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचीही चर्ची होत राहिली.

दरम्यान, काल सायंकाळी अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. आमदार आवाडे हे काल दिवसभर मुंबईत होते. रात्री आठ वाजल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये भाजप प्रवेशाबाबतची चर्चा सुरू झाली, तर भाजपच्याही प्रमुख पदाधिकार्ऱ्यांना याबाबतचा संदेश पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आला. वरिष्ठ पातळीवरुन निर्णय झाल्यामुळे स्थानिक भाजपमधून अद्याप तरी कोणतीही याबाबतची प्रतिक्रिया आलेली नव्हती.

उमेदवारीचा शब्द दिल्याची चर्चा

आमदार आवाडे यांनी पुत्र राहुल यांची विधानसभेसाठी उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यादृष्टीने राहुल हे गतीने कामाला लागले आहेत, तर आगामी विधानसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांना भाजपकडून उमेदवारीचा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून शब्द दिल्याची चर्चा आहे.

हाळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

आमदार आवाडे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून सुरेश हाळवणकर यांची ओळख आहे. या दोघांमधील राजकीय संघर्ष वस्त्रनगरीने पाहिला आहे. हाळवणकर यांच्यामुळेच गेली पाच वर्षे आवाडे यांचा भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा होती. आमदार आवाडे यांनी याबाबत जाहीर विधानेही केली होती. आता आवाडे भाजपमध्ये आल्यास हाळवणकर यांची भूमिका काय राहणार, याकडे आता कार्यकर्त्यांसह जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT