Crime 
कोल्हापूर

इचलकरंजीत मोका'मुळे गुन्हेगारी टोळ्यांना हादरा

पाच वर्षात २० तर दोन महिन्यात तीन टोळ्याच्या आवळल्या मुसक्या

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : नवे म्होरके तयार होवून दहशत निर्माण करू पाहणाऱ्या बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांवर इचलकरंजी पोलीस दलाने मोका कारवाईचा बडगा उगारला. गेल्या ५ वर्षात संघटीतपणे गुन्हे करणार्‍या २० टोळ्यांवर मोका लावला असून यात १३५ गुन्हेगारांचा समावेश आहे. यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांसह सराईत गुन्हेगारांत जरब निर्माण झाली आहे. दोन महिन्यात एकापाठोपाठ तब्बल तीन टोळीवर मोका कारवाई करत शहरातील संघटित गुन्हेगारीवर पोलिसांना नियंत्रण मिळविणे शक्‍य झाले.

वाढते उद्योगधंदे, औद्योगिक वसाहतींमुळे दिवसेंदिवस शहराची हद्द वाढत गेली. वाढीव भागात वर्चस्व निर्माण करण्यातून गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या. त्यातून टोळी युद्ध सुरू झाल्याने खून, खुनी हल्ले, मारामार्‍या अशा गंभीर गुन्ह्यात वाढ होत राहिली. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी इचलकरंजी पोलीस उपाधिक्षक कार्यालयाने कार्यक्षेत्रातील संघटीत गुन्हेगारी करणार्‍यांवर मोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. त्यातून पहिल्यांदा अमोल माळी टोळीवर मोका अंतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला. मोक्का कारवाईत एस.टी. गँगचा समावेश आहे. जर्मनी टोळीवर आत्तापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ३ आणि गावभाग पोलीस ठाण्यात १ असे एकाच टोळीवर चारवेळा मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

२०२१ मध्ये तब्बल ४ टोळ्यांना मोक्का लावला. अशाप्रकारे ५ वर्षात मोका अंतर्गत २० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक ८ गुन्हे शहापूर पोलिस ठाण्यातील असून शिवाजीनगरकडील ८ तर गावभाग आणि हुपरी पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी २ गुन्ह्यांचा समावेश आहे. २० टोळीतील १३५ जण जेलची हवा खात आहेत.मोका कारवाईमुळे गंभीर गुन्हे करणार्‍या टोळ्यांचे अस्तित्वच नामशेष होत आहे. पोलिसांनी आता आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे.

संघटित टोळीवर मोका कारवाई

वर्ष - कारवाई

२०१६-१

२०१७- ४

२०१-९

२०१९-२

२०२१-४

तेलनाडे बंधू फरार एस. टी. गँगमधील विद्यमान नगरसेवक संजय आणि सुनिल तेलनाडे यांच्यावर पोलिसांनी मोका कारवाई केली आहे. मात्र तेलनाडे बंधू अद्याप फरार आहेत. मोका कारवाईतील सर्व गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पोलिसांना यश आले. दुसरीकीकडे तेलनाडे बंधुवर मोका सारखी दुसऱ्यांदा कारवाई करूनही दोघे पोलिसांच्या हाती सापडत नसल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

आजचे राशिभविष्य - 14 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT