इचलकरंजी Sakal
कोल्हापूर

इचलकरंजी महापालिका निर्मीतीत अडथळा? फक्त 2 नगरसेवक वाढणार

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : राज्य शासनाच्या नव्या अद्यादेशामुळे इचलकरंजी (Ichlkarnji) पालिकेमध्ये ११ ऐवजी केवळ २ नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यामुळे नविन सभागृहातील एकूण निर्वाचीत नगरसेवकांची संख्या ६२ ऐवजी ६४ असणार आहे. याबाबतची माहिती नगरसेवक विठ्ठल चोपडे (Vithhal Chopde) यांनी दिली आहे.

दरम्यान, आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या नव्या बदलामुळे राजकीय वर्तुळात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. त्यानुसार सन २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षीत होते. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतांना अडचणी येत आहेत. त्याला पर्याय म्हणून राज्य शासनाने महापालिका व नगरपालिका क्षेत्रात निवडून द्यावयाच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये एकूण निर्वाचीत नगरसेवकांच्या संख्येमध्ये १७ टक्के नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इचलकरंजी पालिकेत नवीन नगरसेवकांची संख्या ११ वाढून एकूण निर्वाचीत नगरसेवकांची संख्या ७३ इतकी होणार होती. पण शासनाच्या नविन अध्यादेशात याबाबत महत्वाची दुरुस्ती करण्यात आली आहे.

नव्या अध्यादेशात 'अ'वर्ग नगरपालिकांसाठी एक लाख लोकसंख्येकरीता किमान ४० नगरसेवक व त्यापुढे प्रत्येकी ८ हजार लोकसंख्येसाठी एक अतिरिक्त नगरसेवक अशी नविन तरतूद केली. त्यानुसार २ लाख ९२ हजार लोकसंख्येच्या आधारे ४० व २४ अशी ६४ इतकी नगरसेवकांची संख्या होणार आहे. यानुसार इचलकरंजी पालिकेमध्ये केवळ २ नगरसेवकांची संख्या वाढून ती ६२ वरुन ६४ होईल, असा दावा चोपडे यांनी केला आहे. त्यामुळे यापूर्वी नविन ११ नगरसेवक वाढणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता नव्या अद्यादेशामुळे केवळ २ नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे याबाबत गोंधळाचा परिस्थिती निर्माण झाली आहे.

महापालिका होण्यात अडथळा

इचलकरंजी महापालिका करण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. पण नव्या अद्यादेशामुळे महापालिका करण्यामध्ये नगरसेवक संख्येचा मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. 'ड' वर्ग महापालिकेसाठी किमान ७६ निर्वाचीत सदस्य संख्या होणे आवश्यक करण्यात आल्या आहे. मात्र इचलकरंजी पालिकेत केवळ ६४ सदस्य संख्या होणार असल्याने महापालिका होण्यात अडथळा होवू शकतो, असे मत चोपडे यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT