covid 19 covid 19
कोल्हापूर

इचलकरंजीत दंडात्मक कारवाईचा बडगा

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर): कोरोनाचा संसर्ग(covid 19) टाळण्यासाठी प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र यामध्ये मास्क( mask) वापरणे सक्तीचे केले होते. तर लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे या दोन्ही घटकांवर तब्बल 15 लाख 67 हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली.यामध्ये 7 लाख 24 हजार 200 इतका मास्क न वापरल्याबद्दल तर 8 लाख 42 हजार 800 रुपये इत विविध आस्थापनांकडून दंड वसूल करण्यात आला होती. ही सर्व रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. यावरुन शहरातील नागरिकांचा बेफिकीरपणा व आस्थापनांचा बेजबाबदारपणा पुढे आला आहे.(ichalkaranji-municipal-corporation-punishment-in-citizens-and-responsibility-of-establishments-covid- 19-update)

शहरात कोरोनाची दुसरी लाटही प्रभावी ठरली. दीडशेहून अधिक नागरीक या लाटेत दगावले आहेत. तर तीन हजारहून अधिक नागरिक बाधीत झाले आहेत.अद्यापही शहरातील संसर्ग कमी झालेला नाही. दररोज सरासरी 50 हून अधिक बाधीत रुग्णांची नव्याने भर पडत आहे. दुसर्‍या लाटेचा प्रभाव वाढत असतांनाच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये प्राधान्यांने मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र अनेक नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले. अशा नागरिकांनावर पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.

एप्रिल महिन्यापेक्षा मे महिन्यात जास्त कारवाई करण्यात आली आहे. 100 रुपये व 500 रुपये अशा दोन प्रकारात ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आजही अशा प्रकारची धडक कारवाई सुरुच आहे. या कारवाईतून अद्यापही नागरिकांनी धडा घेतलेला नाही. दुसरीकडे लॉक डाऊनमुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण कांही आस्थापना सुरु ठेवल्यानंतर त्यांच्यावरही जबर दंड आकारण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेतील कांही आस्थापना मुदतीनंतर सुरु ठेवल्याबाबतही कारवाई करण्यात आली आहेे. कांही आस्थापनाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचा नियम पायदळी तुडविण्यात आला होता. कांही आस्थापनांना सील ठोकण्याची टोकाची कारवाई देखील करण्यात आली आहे. आजही इतक्या प्रमाणात कारवाई होवूनही कोरोना संसर्गाची नियमावलींची पायमल्ली करण्याचे दुर्देवी चित्र शहरात दिसत आहे.

दंडात्मक कारवाई दृष्टीक्षेप

महिना * मास्क कारवाई * आस्थापना कारवाई

एप्रिल * 2,34,800 * 52200

मे * 4,20,000 * 7,82,200

जून (10 जून अखेर) * 69,400 * 84,000

एकूण * 7, 24,200 * 8.42,800

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय; शेअर्स तारण ठेवून 1 कोटी रुपयांचे कर्ज घेता येणार

Deepak Borhade: दीपक बोऱ्हाडेंचे उपोषण तूर्त स्थगित; धनगर आरक्षणाचा लढा, शासनासोबत चर्चा सुरू ठेवण्याचा निर्धार

SCROLL FOR NEXT