Ichalkaranji Neglects To Observe Social Distance In The Market Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आठवडा बाजारातील तोबा गर्दीने इचलकरंजीला 'हा' धोका

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात कोरोनाचा संसर्ग फैलावण्याची भीती असताना व प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र कोणतीही सतर्कता बाळगत नसल्याचे आज आढळले. येथील आठवडा बाजारात आज सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला असून विक्रेत्यांच्याबरोबरच नागरिकही मास्क वापरत नसल्याचे आढळले. त्यामुळे शहरात हा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. 

तीन दिवसात शहरात सात रुग्ण आढळले. कुडचे मळा परिसरातून झालेला फैलाव संसर्गजन्य स्थितीत असल्यामुळे प्रशासन विविध पातळीवर उपाययोजना करीत आहे. ज्या घटकांना परवानगी दिली आहे, त्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र शहरात अशा घटकांकडूनच फारशी कोणतीच गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचे आढळून आले. 

आठवडा बाजारात विक्रेत्यांबरोबरच नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने माहिती जाहीर केली आहे. मात्र त्याला तिलांजली देत आज बहुतांश नागरिक मास्क न वापरता व सोशल डिस्टन्स न पाळता आज बाजारात फिरत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर अनेक विक्रेत्यांच्या ठिकाणी गर्दीही दिसून आली. 

विक्रेत्यांनाही ज्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे ते त्यांच्याकडून होत नसल्याचे आढळून आले. प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र कोणतीच काळजी घेत नसल्याचे या प्रकारावरून आढळून आले आहे. 

नागरिकांचीही जबाबदारी 
एका बाजूला संसर्गातून कोरोना वाढण्याची भीती काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. तर दुसऱ्या बाजूस काही नागरिक बिनधास्तपणे आजही वावरत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सर्वच ठिकाणी प्रशासन कार्यवाही करू शकत नाही. अशावेळी नागरिकांनीही दक्ष राहून शहरासाठी काम करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT