ichalkaranji police started sms campaign crime news 
कोल्हापूर

इचलकरंजीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आता पोलिसांतर्फे "फक्त एक मॅसेज' मोहीम 

पंडित कोंडेकर

इचलकरंजी : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अवैध घटनांवर लक्ष ठेवून त्याची सूचना पोलिसांना द्यावी. त्यासाठी पोलिस दलातर्फे "फक्त एक मॅसेज' ही मोहीम सुरू करीत आहोत, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली. येथील स्वामी अपार्टमेंट परिसरातील पोलिस चौकीत आयोजित केलेल्या नागरिकांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक मनोज हिंगमिरे होते.
 
श्री. महामुनी म्हणाले, ""शहरात सध्या गुन्हेगारी वाढली असल्याचे दिसून येत आहे. आम्ही पोलिस प्रशासनामार्फत शक्‍य तितकी कारवाई करीत आहोत, मात्र नागरिकांचा सहभाग असल्यास नेमकेपणाने कारवाई करता येईल. यासाठी नागरिकांनी आजूबाजूला घडत असणाऱ्या अवैध घटनांवर लक्ष ठेवावे. त्याची माहिती तातडीने संबंधित यंत्रणेला कळवावी. यासाठी आपण "फक्त एक मॅसेज' ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील कोणत्याही विपरीत घटनेची माहिती एक मॅसेज करून आम्हाला कळवावी. ही माहिती पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच शहरभर साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे.

संबंधित गस्तीपथक संबंधितस्थळी भेट देते की नाही, हे पाहण्यासाठी क्‍यूआर कोड बसवण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील पन्नास ठिकाणे निवडली आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल,'' असे श्री. महामुनी यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे उपस्थित होते.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT