हनी ट्रॅपचे गांभीर्य वाढले
हनी ट्रॅपचे गांभीर्य वाढले sakal
कोल्हापूर

इचलकरंजी : हनी ट्रॅपचे गांभीर्य वाढले

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : शहरात हनी ट्रॅपचा विळखा आता घट्ट होत चालला आहे. एका महिन्यात हनी ट्रॅपच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी आपले जीवन संपविले. यामुळे हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या तरुणांना हादरा बसला आहे. पालकांसाठी ही बाब चिंतेची ठरत असून हनी ट्रॅप हा शब्द मानवी जीवनात खोलवर रुजताना दिसत आहे. दोन आत्महत्येच्या प्रकारामुळे आता हनी ट्रॅपची गंभीरता अधिकच स्पष्ट झाली आहे. त्यामुळे समाजावरील हनी ट्रॅपची छाया पुसून टाकण्याची गरज आहे.

सोशल मिडीयाचा अतिवापर आणि त्यातून अश्‍लिल प्रलोभने दाखवून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याच्या हनी ट्रॅपची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे. यामध्ये अडकलेले अनेकजण आजही पोलिसांत तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील पोलीस ठाण्यात काहीजण गेले. मात्र तक्रार देण्यासाठी पुढे सरसावले नाहीत.त्यामुळे पोलीसांना तक्रारीविना स्वस्थ राहावे लागत आहे. समाजात बदनामीच्या भीतीने मागे न राहता स्वतःच्या भल्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. शहर व परिसरात हनी ट्रॅप हा साथीचा रोग बनत चालला आहे. हनी ट्रॅपने दोन बळी घेतल्याने हा विळखा आणखी घट्ट बनला आहे. गंभीरता स्पष्ट झाल्याने पोलीस यंत्रणेनेही हनी ट्रॅपबाबत गंभीर होणे महत्वाचे ठरेल.

फेसबुक, इंस्टाग्रामवर प्रमाण अधिक

फेसबुक इंस्टाग्रामवर एखाद्या सुंदर मुलीचा फोटो डिपी ठेवला जातो. त्या माध्यमातून तरुणांना रिक्वेस्ट टाकली जाते. रिक्वेस्ट आल्यानंतर तरुणांना मेसेज केला जातो. याच डीपीला बघून तरुण आकर्षित होतो. संवाद सुरू केल्यानंतर अश्लील संवाद सुरू होतो. येथेच तरुण जाळ्यात अडकून पडतो. हा सर्व प्रकार फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाच्या अँप्लीकेशनवर होत असल्यासाचे पोलीस तपासात समोर येत आहे.हनी ट्रॅपमधून बळी गेलेल्या दोन घटनांच्या मुळापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

तरुणांना पोलिसांचे आवाहन

मोबाईलवरील अँप्लीकेशनचा वापर कशासाठी होईल हे सांगता येत नाही. हनी ट्रॅप कसा लावेल हे समजणेही कठीण आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या अनोळखी मुलीची रिक्वेस्ट एक्सेप्ट करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तीशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करण्याच्या मोहात पडू नका. वैयक्तिक माहिती पाठवू नका. कोणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. तरीही यातून फसवणूक झाली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'सकाळ'ने वेधले लक्ष

'हनी ट्रॅपच्या विळख्यात तरुणाई' या मथळ्याखाली दोन महिन्यांपूर्वी सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून याला वाचा फोडली.त्यानंतर हनी ट्रॅपला बळी पडून एकाने जीवन संपवले. पुन्हा 'हनी ट्रॅपला वेळीच रोखा' हे वृत्त प्रसिद्ध करून सकाळ'ने लक्ष वेधले. आता हनी ट्रॅपमुळे झालेल्या दुसऱ्या आत्महत्येनंतर याकडे वेळीच पोलिसांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

'सध्या कुटुंबे छोटी असल्याने अंतर वाढत चालले आहे.कौटुंबिक संवाद वाढवून कुटुंबात प्रत्येक सदस्यांशी मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे. यातून अडचणीच्या वेळी संवादातून एकमेकांचा आधार घेता येतो.संवाद न झाल्यास छोटीशी अडचण डोंगराएवढी बनते.वेळीच संवाद झाला तर हनी ट्रॅपसारखे गंभीर प्रकार आणि त्यातून निर्माण आत्महत्येसारखे टोकाचे परिस्थिती रोखता येईल.'

डाॅ. सिमोन आवळे,मानसोपचार तज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT