In Ichalkaranji, There Is Enough Stock For Two Days Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

इचलकरंजीत दोन दिवस पुरेल इतका लससाठा

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : जिल्हा प्रशासनाकडून लससाठा उपलब्ध झाल्यानंतर आज विविध 16 ठिकाणी लसीकरणाला पुन्हा गती आली. बहुतांश ठिकाणी नागरिकांनी लस घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. दिवसभरात तब्बल 2721 नागरिकांनी लस घेतली. अद्याप एक-दोन दिवस लसीकरण चालेल इतका लससाठा शहरात शिल्लक असल्याची माहिती दिली. 

लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दोन दिवस लसीकरण मोहीम बंद पडली होती. जिल्हा प्रशासनाकडून आज सात हजार लससाठा इचलकरंजीसाठी प्राप्त झाला होता. त्यानुसार आज पुन्हा लसीकरणाला गती देण्यात आली. शहरातील विविध 16 ठिकाणी लसीकरण करण्यात येत होते. सकाळी बहुतांशी केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. किंबहूना लस घेण्यासाठी नागरिकांतूनच प्रतिसाद वाढत चालल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. 

शहरात आयजीएम रुग्णालयासह दोन खासगी रुग्णालये व सहा नागरी आरोग्य केंद्रांसह त्यांच्या अंतर्गत सुरू केलेल्या अन्य सहा केंद्रांवर आज दिवसभर लसीकरण मोहीम सुरू होती. सेवा भारती येथेही आज आणखी एक जादा लसीकरण केंद्र सुरू केले. दिवसभरात 2721 नागरिकांनी लस घेतली. अद्याप दोन दिवस पुरेल इतका लससाठा शहरात उपलब्ध आहे. पुरेसा लससाठा मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून पाठपुरावा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT