Ichalkaranjikar stayed at home the next day
Ichalkaranjikar stayed at home the next day  
कोल्हापूर

कोरोनाची चेन ब्रेक करायचीच...इचलकरंजीकर राहिले दुसऱ्या दिवशीही घरीच

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : दुसऱ्या दिवशीही शहर 100 टक्के लॉकडाउनच राहिले. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी शहरवासीय घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट राहिला. पोलिसांचीही दिवसभर शहरात गस्त सुरुच होती. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहर सनिंयत्रण समितीने सलग 72 तासांचा 100 टक्के लॉकडाउन जाहीर केला आहे. यामध्ये पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी प्रतिसाद दिला. शहरातील प्रमुख मार्गही ओस पडले होते. सकाळच्या सत्रात दुधासाठी नागरिकांची तारांबळ उडाली होती. दिवसभर मात्र शहरात शुकशुकाटच होता. 

पहाटे व रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. पण लॉकडाउनमुळे नागरिक प्रथमच फिरण्यासाठी बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे सांयकाळी सात वाजल्यानंतर तर सर्वत्र शुकशुकाट जाणवतो. पोलिसांची गस्त दिवसभर सुरु होती. 

कांही ठिकाणी नागरीक घराबाहेर येवून थांबत आहेत. पण पोलिसांचे वाहन आल्यानंतर असे नागरिक पळापळ करतांनाही दिसत होते. उद्या (गुरुवार) लॉकडाउनचा तिसरा दिवस असणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 ते 11 या वेळेत शिथीलता दिली जाणार आहे. या कालावधीत नागरिकांनी केवळ अत्यावश्‍यक साहित्यांची खरेदी करता येणार आहे. 

दृष्टिक्षेप 
- इचलकरंजीत दुसऱ्या दिवशीही 100 टक्के लॉकडाउन 
- पोलिसांची दिवसभर गस्त 
- शहरातील प्रमुख मार्गही पडले ओस 
- शुक्रवारी सकाळी 6 ते 11 या वेळेत शिथिलता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT