Ichalkaranji's Vavade Ka Re Baba 
कोल्हापूर

इचलकरंजीचे तुम्हाला वावडे का रे बाबांनो

पंडित कोंडेकर

इचलकरंजी ः इचलकरंजी कामगारांचे गाव आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. प्राधान्यांने सर्व प्रकारच्या सुविधा देण्याची आवश्‍यकता आहे; पण त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तिन्ही मंत्री इचलकरंजीतील प्रश्‍नांकडे सकारात्मकपणे पाहत नाहीत, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 
आमदार आवाडे म्हणाले, ""आयजीएम रुणालयात विविध सुविधा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; पण सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इचलकरंजी कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे प्राधान्यांने सुविधा देण्याची जबाबदारी शासनाची आहे; पण जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांकडून इचलकरंजीच्या प्रश्‍नांकडे सकारात्मक पाहिले जात नाही. आयजीएम रुग्णालयाकडील 43 कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न प्रलंबित आहे. तिन्ही मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले असते तर हा प्रश्‍न सहज सुटला असता. राजकारणांत हा विषय अडकला. केवळ आपण हा विषय मार्गी लावत असल्यामुळेच तो बाजूला ठेवला गेला.'' 
आरोग्य विभागाची मान्यता नसतांना कर्मचाऱ्यांना परस्पर शासनाच्या सेवेत घेतल्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवल्याचे सांगण्यात आले. पण हा प्रश्‍न पुढील काळात आपण मार्गी लावणार आहोत. माझी कामे कोणीही थांबवू शकणार नाही, असे आव्हानही आमदार आवाडे यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे दिले. 


इचलकरंजीत जनता कर्फ्यू नाही 
कोरोना संसर्ग वाढत असला तरी इचलकरंजीत जनता कर्फ्यूची आवश्‍यकता नाही, असे स्पष्टीकरण आमदार आवाडे यांनी दिले. ते म्हणाले, ""इचलकरंजी सुरुवातीला प्रभावी लॉकडाऊन केले आहे. आता वस्त्रोद्योग सुरळीत होत आहे. त्यामुळे परत जनता कर्फ्यू परवडणारा नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुविधा देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यापुढे उद्योगालाही मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर आपले प्रयत्न राहणार आहेत.'' 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Strawberry Cultivation : आंबेगाव, खेड, जुन्नर व मावळ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ४.९६ कोटी रुपये निधी मंजूर; विधानसभा माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

SCROLL FOR NEXT