कोल्हापूर

इचलकरंजीत मंडळावर कारवाई; नगरसवेकासह ८ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करत गणेश मंडळासमोर गर्दी जमवल्याप्रकरणी येथील झेंडा चौक मंडळावर पोलिसांनी कारवाई केली. यात नगरसेवकासह आठ जणांवर गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल केला. अजित महादेव जाधव, नगरसेवक अमरजित राजाराम जाधव, अर्थव उरुणकर, योगेश पवार, संकेत कांबळे, संकेत डंबे, निलेश जाधव, गौरव जाधव (सर्व झेंडा चौक) अशी त्यांची नावे आहेत. मंडळाने एलईडी लाईट, फोकस, लेसर शो पाहण्यासाठी मंगळवारी (ता. १४) रात्री नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, झेंडा चौक मंडळ गणेशोत्सवात आकर्षक गणेश मूर्ती, देखावा सादर करते. यावर्षीही वेगळपण कायम ठेवत समुद्रमंथन रुपात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्याच्या उद्‍घाटनावेळी मंडळाने १४ सप्टेंबरला मंडपासमोर एलईडी लाईट, फोकस, लेसर शो सादर केला. शासनाने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करत नागरिकांची गर्दी जमली. या प्रकरणी मंडळाच्या आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पहिलीच कारवाई

जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात प्रथमच एका मंडळाने तुफान गर्दी जमवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी नगरसेवकासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल अन... पोलिस जागे

मंडळाच्या उद्‍घाटनप्रसंगी राजवाडा चौक पोलिस बंदोबस्ताला होते. तरीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमवत उद्‍घाटन केले. रात्री पाहता पाहता उद्‍घाटनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर झळकले. त्यानंतर पोलिसांनी जागे होऊन मंगळवारी रात्री उशिरा मंडळातील आठ जणांवर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT