vaccination sakal
कोल्हापूर

इचलकरंजीत 'या' सात खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्राला मंजुरी

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : कोरोना प्रतिबंधक उपाय योजनामधील महत्वाचा भाग असलेल्या कोविड लसीकरणाला आता वस्त्रनगरीत अधिक गती येणार आहे. शहरात आणखी सात खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या ठिकाणी सशुल्क लसीकरण करण्यात येणार आहे. यामुळे आता शहरात एकूण २२ ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सोय उपलब्ध झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होत आहे. तर तिस-या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे शासनाकडून कोविड प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. केवळ लसीकरणामुळे दुस-या लाटेत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. तर लसीकरणानंतर संसर्ग झालेल्यांचे प्रमाण फार कमी आहे. तर दोन डोस घेतलेले नागरिक तर अधिक सुरक्षीत झाले आहेत. त्यामुळे लसीकरणाचे महत्व स्पष्ट झाल्यानंतर नागरीकांची लसीकरण केंद्रावरील गर्दी आजही कायम आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, दुस-या टप्प्यात ४५ वर्षावरील नागरिक आणि आता तिस-या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास मंजूरी देण्यात आली आहे.

इचलकरंजी शहरात एकूण २२ ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सोय उपलब्ध झाली आहे.

सद्या लसीकरण मोहिमेला हळूहळू गती येत आहे. मात्र शहराच्या लोकसंख्येचा विचार करता लसीकरण केंद्राची संख्या अपुरी आहे. सध्या सहा नागरी आरोग्य केंद्र व सहा उप केंद्र अशा १२ ठिकाणी मोफत लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी सध्या सुरळीत लसीकरण सुरु आहे. या शिवाय यापूर्वीच स्पंदन हाॅस्पीटल, काजवे हाॅस्पीटल, गॅलॅक्सी हाॅस्पीटल तीन खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी सशुल्क लसीकरणासाठी मंजुरी देण्यात आली होती.

आता आणखी सात खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यास जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.योगेश साळे यांनी मंजुरी दिली आहे. या ठिकाणी शासनाने निश्चीत केलेल्या दरानुसार डोस घेता येणार आहे. त्यापेक्षा जादा शुल्क आकारणी करता येणार नाही. यापूर्वी या संदर्भात प्रशासनाकडून आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्य़ाचे आवाहन केले होते. त्याला खासगी रुग्णालयांनी चांगला प्रतिसाद दिला होता. शहरात सद्या दररोज १९०० ते २००० नागरिकांचे लसीकरण होत आहे. आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार असल्यामुळे लसीकरणाला अधिक गती येण्यास मदत होणार आहे.

नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत सहा उपकेंद्र सुरु

शहरात सहा नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण सुरु आहे. आता आणखी सहा उप केंद्राच्या ठिकाणी लसीकरण सुरु केले आहे. नागरी आरोग्य केंद्र व उपकेंद्र (कंसात) असे - १) जवाहरनगर (छत्रपती संभाजी विद्यामंदीर शाळा क्रमांक ३५, जवाहरनगर), २) चांदणी चौक (कलागते हाॅल, राममंदीरजवळ), ३) लालनगर (सुभेदारकाका विद्यामंदिर क्रमांक ४८, विक्रमनगर), ४) तांबे माळ (संत गाडगे महाराज विद्यामंदिर क्रमांक ५०, राजर्षी शाहू पूतळ्याजवळ), ५) कलावंत गल्ली (वडगांव कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली रोड), ६) शहापूर (अशोका हायस्कूल, गणेशनगर).

नवीन खासगी लसीकरण केंद्रांची नावे अशी,

  • अलायन्स हाॅस्पीटल (चंदूर रोड)

  • डाॅ.हेगडेवार रुग्णालय (नाट्यगृह परिसर)

  • साफल्य हाॅस्पीटल (आमराई रोड)

  • पिंक लोटस हाॅस्पीटल (कोल्हापूर नाका)

  • कल्पवृक्ष हाॅस्पीटल (स्टेशन रोड कमान)

  • सरस्वती हाॅस्पीटल (कागवाडे मळा)

  • साई समर्थ हाॅस्पीटल (इंदिरा काॅलनी)

लसीकरण दृष्टीक्षेप (२८ आॅगष्ट अखेर)

  • ४५ वर्षावरील * १८ ते ४४ वयोगट

  • उद्दीष्ट - १०५६३६ * १२७८७७

  • पहिला डोस - ५९२८८ * १९७४६

  • दुसरा डोस - ४२१७४ * १५६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT