The ideal of the chief of Chandgad
The ideal of the chief of Chandgad 
कोल्हापूर

चंदगडच्या मुख्याधिकाऱ्यांचा आदर्श

सुनील कोंडुसकर

चंदगड (कोल्हापूर) ः येथील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी स्वतःहून क्वारंटाईन झाले. गेल्या आठवड्यात ते गावी सोलापूर येथे जाऊन आले. तो भाग रेडझोन असल्याने शहरात येताच ते कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. ते क्वारंटाईन कक्षातूनच प्रशासकीय कामकाज हाताळत आहेत.

पदाची सूत्रे घेताच कोरोनाची साथ सुरू झाली. सुरवातीपासून त्यांनी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी घेतली. भाजीपाल्याचे सोशल डिस्टन्सिंग राखून नव्या जागेत स्टॉल्स उभे केले. बाजारही गावच्या एका बाजूला भरवण्यास सुरवात केली. त्या वेळी स्थानिक नागरिकांना त्यांचे नियम जाचक वाटले. परंतु, सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यावर मात्र त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. नुकत्याच लागलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची तहसीलदारपदी निवड झाली. म्हणून त्यांनी मुख्याधिकारीपदाकडे दुर्लक्ष केलेले नाही. गेल्या आठवड्यात ते कुटुंबीयांना भेटण्यासाठी सोलापूरला गेले. परंतु, तिथून येताच खबरदारी म्हणून त्यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली. त्यानंतर ते क्वारंटाईन कक्षात दाखल झाले. 

मुख्याधिकाऱ्यांनी कोरोनाच्या लढाईत झोकून देऊन काम केले. त्यांचे नियम सुरवातीला जाचक वाटत होते; परंतु ते आपल्याच हिताचे आहेत हे पटल्यावर त्यांच्याविषयीचा आदर वाढला आहे. 
- प्रमोद कांबळे, माजी सदस्य, ग्रामपंचायत चंदगड. 
 

संपादि - रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT