Identify adulteration when shopping Spices are expensive kolhapur  sakal
कोल्हापूर

खरेदी करतानाच भेसळ झाल्‍याचे ओळखा

खबरदारी आवश्यक; काजूगरमध्ये बिस्किटाचा लगदा

अमोल सावंत, कोल्हापूर

कोल्हापूर : मसाले महाग असल्याने त्यात भेसळीचे प्रमाण वाढते. अशी भेसळ आरोग्यास हानिकारक असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. मसाले पारखून घेतले पाहिजेत. जे मसाल्याचे पदार्थ आहारात वापरतात, त्यांना मसाल्यातील भेसळ लक्षात येते. यासाठी भेसळ नेमकी कशी होते, कोणते घातक पदार्थ मसाल्यात टाकले जातात, याची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे.

काहीजण मसाले घेऊन ते घरीच पूड तयार करून अन्न करताना वापरतात. अशा लोकांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. मसाला अनेक भागांतून प्रवास करत कोल्हापुरात येतो. त्यामुळे मसाल्यात नेमकी कोणती भेसळ झाली, ते समजत नाही. हीच गोष्ट सुकामेव्याच्या बाबतीतही घडते. जसे की, काजूचे अखंड गर स्वस्त विक्री होते. दसरा, दिवाळीत काजू गर विकणारे लोक कोल्हापूर परिसरात दिसतात. सध्या काजूच्या गराचा दर हा ७०० ते ८०० रुपये किलोने आहे; मात्र हे लोक २०० ते ३०० रुपये किलोने देतात. या काजूमध्ये बिस्किटाचा लगदा टाकून तो काजूच्या मोल्डमध्ये टाकला की, काजू खराखुरा तयार होतो. वरून पाहिले तर खरेच काजू गर आहेत, असे दिसते. जेव्हा असे गर खाल्ले जातात, तेव्हा यातील फोलपणा लक्षात येतो.

अशी होते भेसळ

  • मोहरीत धोतऱ्याचे बीज मिसळतात. ते विषारी असते. धोतऱ्याचा दाणा एका बाजूला त्रिकोणी आणि मोहरीपेक्षा लहान असतो.

  • जिरे किंवा बडीशेपमध्ये गवताचे बीज मिसळून त्याला कोळशाने रंगवितात.

  • लवंग, दालचिनीत मसाल्याच्या पदार्थांचा अर्क काढून घेतात. निःसत्त्व माल बाजारात विकतात, यातील भेसळ पाण्यावर तरंगते.

  • लाल तिखटात विटकरीचा भुगा मिसळतात. हे तिखट ग्लासभर पाण्यात टाकल्यास भेसळ खाली जाते. मिरचीचे तिखट पाण्यावर तरंगते.

  • हळदीत मेटॅलिक यलो हा अपायकारक रंग मिसळतात. मेटॅलिन यलो पावडर असेल तर ताबडतोब रंग जांभळा होतो.

  • हळदीत रंगीत भुसा किंवा खडूची पावडरही मिसळतात.

  • काळ्या मिऱ्यांत पपईच्या वाळलेल्या बिया मिसळतात. हे मिश्रण ग्लासभर पाण्यात टाकल्यास काळी मिरी खाली बसतात. पपईच्या बिया तरंगतात पपईच्या बियांमुळे अंधत्व येऊ शकते.

  • शुद्ध हिंग पाण्यात विरघळतो, पाण्याचा रंग पांढरा होतो.

  • केशरात मक्‍याचे तुरे (केसासारखे धागे) वाळवून मिसळतात, तुरे ओढले तर लगेच तुटतात.

  • केशर सहज तुटत नाही. ते चिवट असते हा नमुना पाण्यात टाकल्यास केशरातून शेवटपर्यंत रंग पाझरतो. केशरचा वास कायम येतो.

  • दालचिनी वर्तुळाकार, बारीक आणि लवचिक असते.

  • भेसळ दालचिनीला अनेक थर आणि ती कठीण असते. यात बाभळीच्या सालीची भेसळ करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT