if action on who wrong sms forward against doctor 
कोल्हापूर

सावधान ; डॉक्टरांना बदनाम करताय! होणार कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

झरे (जि. सांगली)- (ता. आटपाडी) येथील रुग्णांना खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवून त्यांना बदनाम करण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळामध्ये असा प्रकार घडल्यास किंवा ज्यांनी अफवा पसरविली आहे, तो  व्यक्ती सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल येईल, असे तहसीलदार सचिन लंगुटे म्हणाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी, विरळी (ता. माण) येथील पंचवीस वर्षाचा तरुण पॉझिटिव्ह सापडल्याने सर्व परिसर हादरून गेला होता. त्याचा संपर्क झरे परिसरामध्ये आला आहे, अशी चर्चा सुरू होती आणि त्या पंचवीस वर्षाच्या तरुणांचा काही डॉक्टरांशी संपर्क आलेला आहे. त्या डॉक्टरला क्वरंनटाईन केले आहे, अशी अफवा पसरवली जात  असून खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टर स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णांना सेवा देतात आणि त्यामध्ये  अशी खोटी अफवा पसरवून डॉक्टरांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा खोट्या अफवा पसरून डॉक्टरांना बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे विनाकारण बदनामी करू नये, असे लंगुटे यांनी आवाहन केले आहे. 

विरळी येथील तरुण पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच झरे येथील काही नागरिक मुंबई वरून आले होते. ते नागरिक  क्वरानटाईन होण्यास विरोध करत होते. शिवाय ते दवाखाना व मेडिकलच्या आसपास राहत होते. त्यामुळे काही काळ मेडिकल व दवाखाने बंद ठेवले होते. त्या अनुषंगाने डॉक्टरांचा पॉझिटिव्ह तरुणांशी संपर्क आला आहे, त्यांना तपासण्यासाठी सांगलीला हलवण्यात आले आहे, अशा आशयाच्या  अफवा पसरविल्या जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवरत सर्व दवाखाने बंद ठेवले होते. सर्व डॉक्टरांना ग्रामपंचायत, तहसीलदार व  नागरिकांनी ऋग्णसेवा चालू ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दवाखाने उघडून रुग्णांची सेवा सुरू ठेवली आहे. रुग्ण सेवा देत असताना अशा अफवांना सर्व डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे.

डॉक्टरांना विनाकारण बदनाम करणारा सापडल्यास त्याच्यावरत दंडात्मक कारवाई करणार आहे. 
- सचिन लंगोटे, तहसीलदार


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टरांनी दवाखाने बंद केले होते. त्यांना सांगून दवाखाने सुरू करण्यास सांगितले. सर्व डॉक्टर रुग्णांना सेवा व्यवस्थित देतात. काहीतरी अफवा पसरून डॉक्टरांना बदनाम करत आहेत. हे समाजकंटकांनी थांबवावे.
- ब्रह्मानंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT