If garbage is thrown on the road, it will have to be torn Acknowledgment; Municipal action 
कोल्हापूर

कचरा रस्त्यावर टाकल्यास फाडावी लागणार  पावती ; महापालिकेचा कारवाईचा दणका 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या तसेच थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याचे आढळल्यास जाग्यावर दीडशे रूपये तर थुंकल्यास शंभर रूपयांचा दंड आकारला जाणार आहे. नव्या वर्षात कंटेनर फ्री सिटीचा संकल्प महापालिकेने केला आहे. प्रमूख चौकातील कचरा साठवून ठेवणारे कंटेनर हटविण्याचे काम सुरू आहे. "येथे कचरा टाकू नये' असा फलक लिहला तरी फलकाखाली कचरा टाकणारे काहीजण आहेत. 
शहरात कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेदिवस गंभीर होत आहे. झूम प्रकल्पावर कचऱ्याचा ढीग लागला आहे. कचरा विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न असताना रस्त्यावर कचरा टाकण्याची समस्या उभी राहिली आहे. विनंती करूनही कोणी प्रतिसाद देत नसल्याचे ध्यानात आल्यानंतर दंडात्मक कारवाईचा निर्णय झाला. रस्त्यावर जागा मिळेल तेथे चालत्या वाहनावरून रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्या विरोधात चळवळ सुरू झाली तरी सिग्नला उभे राहिल्यानंतर अथवा रिकामा रस्ता नजरेस पडल्यानंतर थुंकणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या मंडळीवर शंभर रूपये दंड भरावा लागणार आहे. 
हागदारीमुक्तीच्या दृष्टीने शहराची वाटचाल सुरू झाली असताना नजर चूकूवून उघड्यावर शौचास जाणारे अजूनही काहीजण आहेत. 
आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे उघड्यावर शौचास बसल्याचे आढळल्यास पाचशे रूपये दंड केला जाणार आहे. घरोघरी शौचालय असावे यासाठी अमृत योजनेतून ड्रेनेजलाईन जोडून दिली गेली आहे. उघड्यावर शौचास बसल्याचे आढळून आल्यास दंडाची आकारणी होणार आहे. रिकामा कोपरा अथवा गटर दिसल्यानंतर उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अशांना शंभर रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. एखाद्या मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिती करून तो उघड्यावर टाकल्यास पाचशे रूपये इतका दंड आकारला जाणार आहे. 

प्लॅस्टिक वापराबद्दल रोख दंड ते कारावास 
प्लॅस्टिक बंदी पूर्वीच लागू झाली आहे.प्लॅस्टिक अथवा थर्माकॉलच वापर केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार, नंतरच्या गुन्ह्यासाठी दहा हजार, तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास पंचवीस हजार रूपये दंड अथवा तीन महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार आहे. बांधकामासाठी रस्त्यावर खरमाती, मुरूम,वाळू टाकल्याचे आढळल्यास प्रति चौरस मीटर शंभर रूपये दंडाची आकारणी होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT