If there is a dumper, there is no barricade, 
कोल्हापूर

डंपर आहे तर बॅरिकेड नाही, बॅरिकेड आहे तर डंपर नाही... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : डंपर आहे तर बॅरिकेड नाही, बॅरिकेड आहे तर डंपर नाही, अशी अवस्था महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची झाली आहे. चार महिन्यांपासून रात्रीचा दिवस करून ही यंत्रणा राबत असली तरी आयत्यावेळी रुग्ण सापडल्यानंतर यंत्रणा कमी पडत असल्याने धावाधाव करावी लागते, यामुळे यंत्रणेवर ताण पडत आहे. 

दोन दिवसांपूर्वी रंकाळा टॉवर येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर रात्री अशीच धावपळ उडाली. बॅरिकेड आणण्यासाठी डंपर नेमका कुठे आहे, याचा शोध घ्यावा लागला. रात्री दोनच्या सुमारास यंत्रणेची धावपळ थांबली आणि हा परिसर सील झाला. कोरोनाच्या संकटकाळात महापालिका प्रशासनाने सर्वोत्तम काम केले आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने रस्त्यावर असतात. 

दिवसा एखाद्या ठिकाणी रुग्ण सापडल्यास प्रशासकीय तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी तातडीने धाव घेतात. रात्रीच्या वेळी रुग्ण सापडल्यास अडचण निर्माण होते. कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्यापुढे "केएमसी' असा उल्लेख असतो. नंतर संबंधित रुग्ण नेमका कुठे राहायला आहे, याची शोधाशोध सुरू होते. संबंधित भागात तो संपर्कात आला असल्यास बॅरिकेडसह, औषध फवारणीची टीम तैनात करावी लागते. रात्रीच्या वेळी अशी टीम नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. 

शहरात कोरोना रुग्णांच्या संख्या वाढू लागली आहे. एप्रिल, मेपेक्षा जुलैमध्ये रुग्ण संख्या वाढेल की काय? अशी स्थिती आहे. पालिकेच्या यंत्रणेवर ताण येणार आहे. शहरासह उपनगरातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. रात्रीच्या वेळी रुग्ण आढळून आल्यास यंत्रणेला धावपळ करावी लागणार आहे. औषध फवारणी करणाऱ्याचा शोध घ्यावा लागतो. संबंधित भागही सील करावा लागतो. त्याचवेळी रुग्णाच्या संपर्कात कोण आले, याची माहिती घ्यावी लागते. प्रशासकीय यंत्रणेने प्रसंगी जीव धोक्‍यात घालून काम केले आहे. नर्ससह डॉक्‍टर कोरोना योद्धा आघाडीवर असतात. रात्रीच्या वेळी स्वतंत्र टीम तैनात केल्यास दिवसभरातील यंत्रणेवर ताण येणार नाही, अशी प्रतिक्रिया नगरिकांतून व्यक्त होऊ लागली आहे. 

कोरोनाच्या काळात प्रशासनाने चांगले काम केले आहे, मात्र रात्रीच्या वेळी कोरोना रुग्ण सापडल्यानंतर सहजासहजी यंत्रणा उपलब्ध होत नाही. ज्या भागात रुग्ण आढळतो, तेथे तातडीने औषधफवारणी करणे गरजेचे असते. त्यावेळी कर्मचारी उपलब्ध होत नाही. रात्री स्वतंत्र टीम प्रशासनाने तैनात करावी. 
- इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक 

दृष्टिक्षेप

- रुग्णांच्या संख्या वाढल्याने, ताण वाढतोय 
- आपत्कालीन यंत्रणेची उडते धावपळ 
- रात्रीच्या वेळी रुग्ण सापडल्यास अडचण 
- नर्ससह डॉक्‍टर कोरोना योद्धा मात्र आघाडीवर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT