If there is no social gap petrol diesel gas will not be available in kolhapur 
कोल्हापूर

सामाजिक अंतर नसल्यास पेट्रोल, डिझेल, गॅस मिळणार नाही 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार "मास्क नाही- प्रवेश नाही' तसेच "सामाजिक अंतर नसेल तर पेट्रोल- डिझेल- गॅस वितरणही नाही' ही मोहीम राबविण्यात येईल.

मोहिमेत प्रत्येक सिलिंडरवर, पेट्रोलपंपावरील वाहनांवर जनजागृतीचे स्टीकर चिटकविण्यात यावेत, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधित कंपन्यांना दिले आहे. 
जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रामार्फत ग्राहकांना सेवा पुरविल्या जातात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेवा मिळविण्यासाठी नागरिकांची ये-जा सुरू असते. या पार्श्वभूमीवर शासनाची "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेत आपण व संबंधित वितरक सहभागी होऊन जाणीव जागृती करावी, अशी सूचना थोरात गॅस एजन्सी, रामकृष्ण इंडेन, पाटील गॅस एजन्सी, रिलायन्स पेट्रोल व एस्सार पेट्रोल या पेट्रोल व गॅस एजन्सींना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत. 

पेट्रोल व डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रांच्या ठिकाणी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' व "मास्क नाही, प्रवेश नाही', सामाजिक अंतर नसेल तर पेट्रोल/ डिझेल/ गॅस वितरणही करू नये. दर्शनी भागात 10 बाय 15 फुटांचे मोठे फलक लावावेत, पंपावर ठिकठिकाणी स्टीकर चिकटविणे व मास्क नसल्यास प्रवेश न देण्याचे बंधनकारक करावे, तसेच सामाजिक अंतर नसेल तर सेवा किंवा वस्तूचे वितरणही करू नये, याबाबत सूचना द्याव्यात, असेही म्हटले आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : लग्न जुळत नसल्याने युवकाने संपवलं जीवन

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT