If you are an IT engineer, you should know about this opportunity in Kolhapur 
कोल्हापूर

आयटी इंजिनिअर आहात तर कोल्हापुरातील या संधीची माहिती घ्यायलाच हवी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर ः "सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सोल्युशन द्या, पैसे मिळवा' असा फंडा आता स्थानिक आयटी (इन्फरमेशन टेक्‍नॉलॉजी) मध्ये सुरू झाला आहे. तब्बल वीस हजार कोटींचे मार्केट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सॉफ्टवेअर बनवून देण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. साखर कारखाने, दूध डेअरी, शेती उत्पादने, फूड चेन, सेवा व्यवसायात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे पुणे, बंगळूर, दिल्लीत जाऊन इतर कंपन्यांमध्ये नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय गावातून घरातून करणे शक्‍य झाले आहे. 
कोरोना महामारीमुळे अनेक तरुण इतर जिल्ह्यात, राज्यातून कोल्हापुरात आले आहेत. त्यांच्यासाठी आयटी सोल्युशनमधील ही संधी त्यांनीच हेरण्याची आता गरज आहे. सध्या कोरोना महामारीत अनेक कर्मचारी कोल्हापुरात आले आहेत. कंपन्यांकडून त्यांना "वर्कफ्रॉम होम' करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र तरीही ते स्थानिक नोकरी शोधत आहेत. अशाचवेळी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केल्यास तरुणांची उन्नती आपल्या गावातून होऊ शकते, असा विश्‍वास आयटीतील तज्ज्ञांनी दाखवला आहे. 

परदेशातील कंपन्यांना आयटीतील सुविधा पुरवून, त्यांना सेवा उपलब्ध करून डॉलरमध्ये पैसे मिळतात म्हणून या क्षेत्राचे आकर्षण वाढले आहे. पुणा, बंगळूर, दिल्लीतील कंपन्यांकडून बीपीओ चालविण्यापासून परदेशातील कंपन्यांना इतर सेवादेण्याचे काम करतात. अशाच कंपन्यांमध्ये राज्यातील सर्वच भागातील तरुण नोकरीसाठी जातात. कोरोनामुळे घरी आलेल्यांना इतर राज्यात किंवा जिल्ह्यात जावून नोकरी करण्याची भिती वाटत आहे. भविष्याचा विचार करून ते स्थानिक रोजगाराच्या संधी शोधत आहेत. 
देशात तब्बल साडेचार कोटी कंपन्यांनी जीएसटीसाठी रजिस्ट्रेशन केले आहे. या पैकी कोल्हापूर जिल्ह्यात 20 हजार कोटींची उलाढाल आहे. येथे सेवा, ट्रेडिंग आणि उत्पादन अशा तीन क्षेत्रात आयटीतील तरुणांना सॉफ्टवेअर बनवून देण्याची संधी आहे. लहान,मध्यम आणि मोठी अशा सर्वच क्षेत्रात याचा वापर होऊ शकतो. 

येथे आहे संधी 
- खाद्यपदार्थांच्या मार्केटिंगसाठी ऍप तयार करणे 
- उत्पादनातील वेळ वाचविण्याचे साफ्टवेअर बनविणे 
- ऑनलाईन शिक्षण सोपे करणे 
- शेती उत्पादनांचे ऑनलाईन मार्केटिंग 

जिल्ह्यात सारख कारखाने, इतर उत्पादन मार्केट, ट्रेडिंग शॉपी, गांधीनगर मार्केटिंग, वेगवेगळ्या शॉपी, धान्य मार्केटिंग, सूत गिरणी, शेतीतील प्रयोग, दूध संकलन, एमआयडीसीतील उत्पादनातील वेळ वाचविणे, अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणी तरुणांनी स्वतःच्या कौशल्यावर सॉफ्टवेअर, ऍप अपडेट करून काम सोपे करण्याचे सोल्युशन देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. ही संधी तरुणांनी घेतली पाहिजे. 
विनय गुप्ते, व्यवस्थापकीय संचालक, कॉम्पसर्व कन्सल्टंटस्‌ प्रा. लि. 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी युक्तीवाद संपला

Gold and Silver Rates: १० दिवसांत सोन्याच्या दरात १३,४९४ ची घसरण, चांदीही स्वस्त झाली, खरेदीसाठी ही योग्य वेळ?

Amit Shah: पश्चिम बंगाल निवडणूक देशाच्या सुरक्षेशी निगडित: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, ‘तृणमूल’ सरकारविरोधात भाजपचे ‘आरोपपत्र’ जाहीर!

SCROLL FOR NEXT