रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में; म. ए. समितीतर्फे धरणे आंदोलन sakal
कोल्हापूर

रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में; म. ए. समितीतर्फे धरणे आंदोलन

मराठी भाषिकांच्या भावना मांडून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में, खानापूर, बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, कोण म्हणतंय होत नाही झाल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ऐतिहासिक दसरा चौकात आज धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार म्हणाले, "अनेक वर्षे कर्नाटकातील गावे महाराष्ट्रात येणार असे ऐकत आलो आहोत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पोलिसांच्या काठ्या आम्ही अंगावर झेलल्या आहेत. कर्नाटक राज्याने ठराव करुन सर्व फलक कन्नडमध्ये केले आहेत. ते मराठी भाषिकांना वाचता येत नाहीत. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रश्नातून मार्ग काढण्याचे नियोजन केले होते. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही."

काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, " सीमावासीयांच्या भावना तीव्र आहेत. त्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्यापर्यंत नक्कीच पोचवल्या जातील. सीमावासियांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे." अनिल घाटगे यांनी मराठी भाषिकांच्या भावना मांडून त्यांच्यासोबत असल्याचा विश्‍वास दिला.

यावेळी अॅड गुलाबराव घोरपडे, संध्या घोटणे, मधूकर रामाणे, मुरलीधर पाटील, महादेव घाडी, अर्जुन देसाई, विलास बेळगावकर, मऱ्याप्पा पाटील, किरण गवळीगिर, चंद्रकांत गुंडकल, म्हात्रू झुंगरचे, मनोज पावशे, अशोक पाटील, पिराजी मुचंडीकर, दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, विशाल पाटील, विवेक गिरी आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनात १९५७ च्या सीमा लढ्यातील जेलभरो आंदोलनात सहभागी झालेले पुंडलिक चव्हाण, नारायण लाड, शंकर पाटील, नारायण पाटील, शिवाजी पाटील, देवाप्पा घाडी सहभागी झाले होते. त्यांनी मराठी भाषिकांच्या भावना मांडून संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

1 August 2026 Horoscope : मकर अन् मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली! पाहा 12 ही राशींचे आजचे भविष्य

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो : अमित ठाकरे

Amit Shah Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अमित शाहंचा फोटो; 'भारताचा चाणक्य' म्हणून वादग्रस्त बॅनर?; काँग्रेसने विरोध करताच पोस्टर गायब

SCROLL FOR NEXT