Ignoring Layout Approval no-development zone rule approved on a whim 
कोल्हापूर

शंभराहून अधिक नाल्याचे अस्तित्वच गायब ; काय आहे हे प्रकरण

डॅनियल काळे

कोल्हापूर : नगररचना विभागाने लेआउटला मंजुरी देताना नाले, ओढे यांचे अस्तित्व पुसून टाकून आणि नाल्यापासून नऊ मीटर आणि पंधरा मीटर नो डेव्हलपमेंट झोन करण्याचा नियम धाब्यावर बसवून मंजुरी दिल्याने मंगळवारी रात्रीच्या ढगफुटीसदृश पावसाच्या आणि नाल्यांच्या पुराच्या पाण्याने शहरवासीयांची तारांबळ उडाली. कमी वेळेत जादा पाऊस पडण्याचा हा प्रकार असला तरी यापूर्वी कधीही असे पाणी आले नाही, इतके पाणी या पावसाने आले होते. 

ज्या गतीने पाऊस पडत होता आणि पाणी साचत होते, त्या गतीने पाण्याचा निचरा होत नव्हता. अनेक भागात पाणी शिरले, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यातच शहरात रस्ते विकास प्रकल्पात केलेली ५० किलोमीटर रस्त्यावरची शंभर किलोमीटर स्ट्रॉम वॉटर ड्रेनची व्यवस्था नेहमीच कुचकामी ठरली आहे. कोल्हापूर शहराच्या दुसऱ्या विकास आराखड्याचीअंमलबजावणी नाटकच आहे.

प्रत्यक्षात अनेक नियम धाब्यावर बसविले होते. शहरातील अनेक नाले, ओढे यांचे अस्तित्वच पुसून टाकल्याने भविष्यात हा धोका निर्माण होऊ शकतो. मंगळवारी दीड-दोन तासाच्या वेगाच्या पावसाने हा धोक्‍याचा इशारा दिला आहे. आता तरी जागे व्हा, हे पावसाने दाखवून दिले आहे. त्यामुळे नगररचना विभागाच्या नियमावलीची योग्य अंमलबजावणी होण्याची आवश्‍यकता आहे. शहरात अशी काही ठिकाणे आहेत, की तेथील नालेच संपुष्टात आले आहेत. विशेषतः बसंत बहार टॉकीज परिसरातील तो नाला कोठे गायबच झाला आहे. त्याला गटारीचे स्वरुप दिले आहे. 


नागाळा पार्क, केव्हिज पार्क, कनाननगर येथेही हीच स्थिती आहे. शहराची नैसर्गिक ठेवण दक्षिणेला उंच परिसर आणि उत्तरेकडे उतार अशी आहे. देवकर पाणंद परिसरात मात्र याचा विचका झाला आहे. लोकवस्तीच्या मानाने स्ट्रॉम वॉटर ड्रेनची असणारी व्यवस्था तोकडी आहे. 

शहरातील नगररचना विभागाची नियमावलीच धाब्यावर बसविली आहे. नाल्यापासून सरासरी पंधरा मीटर आणि नऊ मीटर बांधकामे करता येणार नाहीत, हा परिसर नो डेव्हलपमेंट झोन असावा, असा नियम आहे. पण या नियमालाच तिलांजली दिली आहे.त्यामुळे शहरात शंभराहून अधिक ठिकाणी नाल्याचे अस्तित्वच गायब आहे. नाल्यालगतची बांधकामेही धोकादायकच आहेत. 
- उदय गायकवाड, पर्यावरण अभ्यासक

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT