Illegal Abortion Case embryo for DNA 
कोल्हापूर

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पडळसह अंबाई टँक परिसरात छापे ; दोघा एजंटाचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

पन्हाळा: वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसताना बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या टोळीचा पोलिस आणि वैद्यकीय पथकाने पर्दाफाश केला. पडळ (ता. पन्हाळा) आणि अंबाई टँक परिसरात छापा टाकून एका बोगस डॉक्टर, दोघा एजंटसह चौघांवर पन्हाळा पोलिस ठाण्यात आज गुन्ह दाखल करण्यात आला. उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६, करंजफेण, ता. शाहूवाडी, सध्या रा. हरीओमनगर अंबाई टँक परिसर), हर्षल रवींद्र नाईक (वय ४०, रा. फुलेवाडी रिंगरोड), एजंट - भरत पोवार (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), दत्तात्रय महादेव शिंदे (वय ४२, रा. पडळ, पन्हाळा) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडळ (ता. पन्हाळा) या गावी स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाला या प्रकरणाची शहानिशा करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले. हे पथक पडळ गावात गेल्यानंतर संशयित दत्तात्रय शिंदे, भरत पोवार हे दोघे एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी पथकाने त्या दोघांशी गर्भपात करण्यासंबधी संपर्क साधला. त्या दोघांनी त्यांना पेशंट घेऊन रात्री पडळ गावी घेऊन येण्यास आणि त्यासाठी २५ हजार रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहपोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, महिला दक्षता समितीच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा अंबले, अमंलदार मिनाक्षी पाटील, रुपाली यादव यांचे पथक तयार करून त्यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

दरम्यान काल सायंकाळी ही दोन्ही पथके कारवाईच्या अनुषंगाने पडळ गावी गेली. त्यासाठी पथकातील एका महिलेस बनावट पेशंट व दोघे जण तिचे नाईकवाईक म्हणून रिक्षाने पडळ येथे गेले. तेथे एजंट शिंदे त्या तिघांना एका घरात घेऊन गेला. तेथे शिवनेरी नावाचे क्लिनिक होते. तेथून त्यांना रंकाळा, अंबाई टँक परिसरात नेण्यात आले. येथे त्यांच्याकडून पाच हजार रूपये घेऊन त्यांना गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने येथे छापा टाकला. येथे ताब्यात घेतलेल्या संशयित उमेश पोवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे चौकशीत पुढे आले.

संशयि हर्षल नाईक याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याच्याकडे प्रमाणपत्र असल्याचे त्याने सांगितले. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी औषधे, सलाईनच्या बाटल्या, गर्भपातासाठी लागणारे साहित्य मिळून आले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर क्लिनिक मध्ये औषधांसह, पेशंट आणि त्यांच्याकडून घेतलेल्या पैशाची यादी मिळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. याप्रकरणी अनिल कवठेकर यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार चौघा संशयितांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ कलम ३३ (१), वैद्यकीय गर्भपात कायदा कलम २ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास अधीक्षक बलकवडे, शाहूवाडीचे उपअधीक्ष रवींद्र साळुंखे, पन्हाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, किशोर पाटील, विलास जाधववर, सहायक फौजदार नाईक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Vanjari Reservation: मराठा आरक्षणासारखा वंजारी समाजाचा प्रश्न सुटणार का? ST मध्ये असल्याचा महत्त्वाचा पुरावा सापडला

Kolhapur Attack : विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या कोल्हापुरातील सायबर चौकात प्राणघातक हल्ला,पार्टीच्या वादातून मित्रांमध्ये वाद

MLA Rohit Pawar: सर्वसामान्यांना त्रास दिल्यास गय नाही: आमदार रोहित पवार; आपण जनसेवक आहोत विसरु नका, तीन हजार परत करायला लावले

SCROLL FOR NEXT