image of Shivchhatrapati flashed everywhere on social media in kolhapur 
कोल्हापूर

अन् छत्रपती शिवाजी महाराजांचे 'हे' प्रतिचित्र सोशल मीडियावर झळकले सगळीकडे...

नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर - कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ चित्राचा आधार घेऊन संगणकीय कल्पकता, मॉडेलिंग, छायाचित्रण, कंपोझिशन, अभिजात भारतीय चित्रकला व मांडणी, अशा विविध कला एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नवे चित्र विपुल हळदणकर व हर्षद पाटील यांनी साकारले आहे. अनेक कला एका चौकटीत बसवून शिवराज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

लॉकडाउन काळात वेळेचा सदुपयोग कसा करायचा, असा प्रश्‍न सर्वांसमोरच होता. विपुल व हर्षद या कलाकारांनी मात्र वेळेचा खऱ्या अर्थाने सदुपयोग करत अनेक कला एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पार्वती व करवीरनिवासिनी श्री. अंबाबाई यांच्या कलाकृती अशाच पद्धतीने साकारल्या. विविध कलांचा वापर करून तयार केलेल्या या कलाकृतींना चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर या कलाकृती व्हायरलही झाल्या. चाहत्यांकडून मिळालेल्या या प्रेरणेतून दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची आगळीवेगळी कलाकृती तयार करण्याचे ठरवले. शिवछत्रपतींच्या भूमिका साकारणारे हर्षल सुर्वे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे मॉडेल म्हणून निवडले. त्यांनीही याला तत्काळ होकार दिला. घरीच त्यांचे शूटही झाले. शिवकाळातील परिस्थितीला साजेसा मेकअप, कपडे आदींची निवड केली. तत्कालिन आयुधे म्हणजेच तलवारी, कट्यार कसे असतील, याचा अंदाज घेतला.

छायाचित्र काढल्यानंतर तलवार व कट्यार यांचे कंपोझिशन करून हुबेहूब शिवछत्रपती डोळ्यांसमोर दिसतील, असे हे प्रतिचित्र तयार केले. अवघ्या पाच-सहा जणांनी स्टुडिओचा वापर न करता आपल्या कलेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवल्या आहेत. ही संकल्पना विपुल हळदणकर यांची असून, हर्षद पाटील यांनी छायाचित्र काढले. सुभद्रा गोपलकर यांनी मेकअपची धुरा सांभाळली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे प्रतिचित्र अवघ्या काही तासांतच सोशल मीडियावर झळकणार आहे. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजःपुंज रूप शिवप्रेमींना प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्‍वास हळदणकर व पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.
 

शिवराज्याभिषेक 2020 या मंगल दिनाचे औचित्य साधून ही कलाकृती प्रदर्शित करीत आहोत. कलायोगी जी. कांबळे व त्यांच्या कलाकृतीचा मान ठेवून ही प्रतिकृती तयार केली आहे. येत्या काळात कोल्हापूर व कोल्हापुरात घडलेले अस्सल कलावंतांचे कार्य प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
- विपुल हळदणकर, हर्षद पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT