Immediately patch the roads in the city ... 
कोल्हापूर

कोल्हापुरातील रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने करा... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील रस्ते पॅचवर्क करण्या संदर्भात केलेल्या नियोजनाबाबत महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी स्थायी समिती सभागृहात पदाधिकारी व संबंधीत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यात शहरातील रस्त्यांचे पॅचवर्क तातडीने करण्यास सांगितले. 

उपशहर अभियंता रमेश मस्कर यांनी पाणी पुरवठा व ड्रेनेज अमृत योजनेच्या कामामुळे 7 ते 8 किलोमीटरचे रस्ते रिस्टोलेशन केले नाहीत. पावसाळ्याच्या कालावधीत खडी, मुरुम टाकून रस्ते करु शकतो असे सांगितले. उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांनी सायबर चौक व टेंबलाईवाडी उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी बावडा प्लॉन्ट येथे डांबर उपलब्ध आहे. 

यावेळी उपमहापौर संजय मोहिते म्हणाले,""सर्व रस्त्यावरील ड्रेनेज व चॅनेल चेंबर वरील मेनव्होल कव्हर रस्ते लेव्हलला उचलून घ्यावीत. पावसाच्या कालावधीत या ठिकाणी पाणी साठून राहते त्यामुळे नागरिकांच्या लक्षात येत नाही. पावसाने उघडीप देताच सर्व रस्त्यांचे डांबरी बेस करण्यात यावेत.'' 

गटनेता शारंगधर देशमुख म्हणाले,""पाणी पुरवठा व ड्रेनेज अमृत योजनेच्या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. परंतू उर्वरीत रस्ते खराब झाले आहेत त्याचे कारण काय ?. सर्वच रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे खराब झाले आहेत. रस्त्याचे काम आजच सुरु करावे, नुसता मुरुम नको खडी मुरुम टाकण्यात यावे. शहरातील रस्त्याची कामे पावसाळ्यापुर्वी का करण्यात येत नाहीत. रस्त्याची कामे आंदोलन केले की काम सुरु केले जाते. कामे सुरु करावी व होणारे बिले संबधित ठेकेदाराकडून वसूल करावा. ज्या कामाचे वर्कऑर्डर नाही. त्याची जबाबदारी उपशहर अभियंत्यांवर देण्यात यावी.'' 

शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने रस्त्याची कामे करता आली नाहीत. उपलब्ध सर्वच कर्मचारी स्टाफ कोरोना विषाणूच्या कामात व्यस्त होता. आता जे फोटो आहेत ते पाणी पुरवठा व ड्रेनेज अमृत योजनेच्या पाईपलाईनच्या कामाचे आहेत. तसेच जाऊळाचा गणपती, गंगावेश, बिंदू चौक, माळकर तिकटी, निलम हॉटेल याठिकाणचे रस्तेचे काम मंजूर आहेत.'' 

दृष्टिक्षेप
- रस्ते कामाबाबत महापालिकेची आढावा बैठक 
- बावडा प्लॉन्ट येथे डांबर उपलब्ध 
- सर्व रस्त्यांचे डांबरी बेस करण्यात यावेत 
- सर्वच रस्ते अमृत योजनेच्या कामामुळे खराब 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT