कोल्हापूर

पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जनाला मनाई

पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेची यंत्रणा आतापासूनच सक्रीय झाली आहे. यंदाही प्रदुषणाच्या कारणास्तव पंचगंगा नदीमध्ये गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यास पालिका प्रशासनाकडून मनाई करण्यात येणार आहे. त्याला पर्याय म्हणून शहरातील विविध ३१ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवले जाणार आहेत. त्यानंतर जमा होणा-या सर्व गणेश मुर्तींचे विधीवत शहापूर खाणीत विसर्जन करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवला प्रारंभ होण्यासाठी अवघे दोन आठवडे राहिले आहेत. आतापासूनच गणेश मुर्तींचे स्टाॅल लागले आहेत. गणेश मुर्ती ठरविण्यासाठी नागरिकांचाही लगबग वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासन पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. यंदाही प्रदुषण टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी गणेश मुर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये करण्यास यंदा पालिका प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. तर पर्याय म्हणून गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शहरातील विविध ३१ ठिकाणी कृत्रीम कुंड ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या ठिकाणी विसर्जीत करण्यात आलेल्या गणेश मुर्त्यांचे शहापूर खाणीत विधिवत विसर्जन केले जाणार आहे. या ठिकाणी दोन क्रेन सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

रस्ते खोदाईबाबत आवाहन

मंडपाची उभारणी करतांना रस्त्यांची खोदाई केली जाते. त्यामुळे रस्ते खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी मंडळांनी रस्ते खराब होवू नयेत, यासाठी पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एक खिडकी योजना १ सप्टेंबरपासून

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी विविध परवाने काढावे लागतात. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही एक खिडकीव्दारे ही सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. १ सप्टेंबरपासून राजीव गांधी सांस्कृतीक भवन येथे सर्व परवाने एकाच ठिकाणी देण्याची सोय केली जाणार आहे. विना परवाना मंडप उभारल्यास कारवाई केली जाणार आहे.

होर्डींग्ज व कमान उभारण्यास मनाई

पालिकेने होर्डिंग्ज मुक्त शहर ठराव केला आहे. त्यानुसार कोणत्याही गणेशोत्सव मंडळाला कोणत्याही प्रकाराची कमान उभारता येणार नाही. तसेच होर्डिंग्ज, बोर्ड, बॅनर, फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT