Almatti Dam Krishna Flood Control Action Committee esakal
कोल्हापूर

Almatti Dam : 'अलमट्टी धरण' सांगली, कोल्हापुरातील महापुराचे मुख्य कारण; कृष्णा कृती समितीचे महाराष्ट्राला 'हे' आवाहन

अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे (Kolhapur Flood) मुख्य कारण आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमलट्टी धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे.

कोल्हापूर : ‘कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणीपातळी जूनपासून ऑगस्टपर्यंत किती असावी, याची निश्चिती कायद्याने केली आहे. केंद्रीय जल आयोगाने (Central Water Commission) याबाबत निर्देशही दिले आहेत. मात्र, याचे पालन होत नाही. जूनपासून ऑगस्टपर्यंत पाणीपातळी कायद्याप्रमाणे राखली जात नाही. त्यामुळे दोन वेळा महापूर आला आहे. त्यामुळे अलमट्टीच्या पाणीपातळीवर महाराष्ट्र शासनाने समन्वयाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अशी भूमिका कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या (Krishna Flood Control Action Committee) पदाधिकाऱ्यांनी मांडली.

याबाबात चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलवावी, असे निवेदनही त्यांनी आज दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. महापुराचे अभ्यासक विजय दिवाण म्हणाले, ‘अलमट्टी धरण हे सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचे (Kolhapur Flood) मुख्य कारण आहे. अमलट्टी धरणाची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७.४० मीटर ठेवणे बंधनकारक आहे.

यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले जलसंपदाचे अभियंता अलमट्टी धरणावर ठेऊन दैनंदिन पाणीपातळी नोंदवावी. कर्नाटक शासनाला अलमट्टीमधील पाणीपातळी निर्देशाप्रमाणे ठेवण्यात भाग पाडावे. याबाबत भूमिका मांडण्यासाठी ७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे.’

नृसिंहवाडीत १६ जूनला पूर परिषद

कुरुंदवाड : ‘यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने लोकांमध्ये महापुराची भीती आहे. महापूर येऊ नये, यासाठी शासनदरबारी दबावगट निर्माण करण्यासाठी व उपाययोजनांचा ऊहापोह करण्यासाठी १६ जून रोजी नृसिंहवाडी येथे तिसरी पूर परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे व विजय दिवाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.

‘आंदोलन अंकुश’च्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून महापुराच्या कारणांचा शोध व उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यंदाही पूर परिषदेच्या माध्यमातून महापुराच्या प्रश्नाची तीव्रता व कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवरुन प्रयत्न व्हावेत, यासाठी जागर केला जाणार असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandoli National Park : चांदोली जंगलात वाघांचे अस्तित्व वाढले; गवे, डुकरं बदलताहेत अधिवास, वनविभाग कोणतं पाऊल उचलणार?

Babar Azam घरगुती वाघ! PSL मध्ये शतक झळकावून केली विराट कोहली, अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी; रोहितला मागे सोडले

Mumbai News: वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी वाईट बातमी! ‘वन नेशन, वन ई-चालान’ महाराष्ट्रात लागू; नियमभंग केला तर थेट दंड

कुर्डुवाडीच्या प्रियांतिकाची सिनेसृष्टीत दमदार एंट्री! ‘फुला’ चित्रपटातून मांडली मुरळीच्या जगण्याची वेदना; चित्रपटाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर अमर देवकर बार्शीचे, वाचा...

ICSE and ISC Result : ‘आयसीएसई’चा ९९.१८ टक्के, तर ‘आयएससी’चा ९९.१३ टक्के निकाल; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT