Kolhapur Flood esakal
कोल्हापूर

Kolhapur Flood : 'या' निकषांचे तंतोतंत पालन झाल्यास महापुराचा धोका टळणार? नदीमार्गातील अडथळे ठरताहेत कळीचा मुद्दा!

संभाव्य महापुराच्या तयारीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

गणेश शिंदे

नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा निर्माण करणे हा महापूर रोखण्याचा पहिला उपाय आहे.

जयसिंगपूर : संभाव्य महापुराच्या (Kolhapur Flood) पार्श्वभूमीवर प्रशासन उपाययोजना करत असताना केंद्रीय जल आयोगाच्या निकषांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. केंद्रीय जल आयोगाच्या (Central Water Commission) निकषांचे तंतोतंत पालन झाल्यास महापुराचा धोका टळू शकतो. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे टळणार आहे.

संभाव्य महापुराच्या तयारीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. पूरबाधित गावातील लोकांची छावण्यांमध्ये सुरक्षित सोय करण्याबरोबरच इतरही बाबींची तयारी केली जात आहे. वास्तविक प्रशासन पातळीवर केंद्रीय जल आयोगाचे निकष कसे पाळले जातील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा निर्माण करणे हा महापूर रोखण्याचा पहिला उपाय आहे. शासनाने अनेक वर्षांपासून वाळू उपसा झाला नसल्याने वाळू उपसा केल्यास महापुराचा धोका टळू शकेल या भावनेतून वाळू प्लॉटचे लिलाव केले आहेत.

महापुराचे पाणी पंधरा दिवस तुंबून राहते हाच नुकसानीचा मुद्दा आहे. शिरोळ तालुक्यातील ५३ पैकी ४२ गावांना महापुराचा फटका बसतो. शेती, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतेच शिवाय या भागातील जनजीवनही विस्कळीत होते. याचा जनावरे आणि दुधाच्या वाहतुकीवरही परिणाम होतात. तालुक्यातील सुरक्षित गावातील शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या छावण्या तयार केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचे दुष्परिणाम जाणवत आहेत.

एकूणच महापुरात तालुक्यातील जवळपास ९५ टक्के गावातील शाळा बंद राहतात. प्रशासनाकडून संभाव्य महापूर येणार हे गृहीत धरून युद्धपातळीवर उपाययोजना राबवली जात आहे. प्रशासनातील सर्वच घटक यासाठी सक्रिय आहे. महापूर आल्यानंतर उपाययोजना राबवल्या जात असताना महापूर येऊच नये यासाठी याकडे डोळेझाक होत असल्याची भावना पूरग्रस्त गावातील लोकांची आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केंद्रीय जल आयोगाचे निकष तंतोतंत पाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनावर दबाव आणण्याची गरज आहे. काही प्रमाणात महापुराचा धोका टळू शकतो. मात्र ‘जखम मांडीला, मलम शेंडीला’ अशी काहीशी अवस्था महापुरावरून निर्माण झाली आहे.

मार्गदर्शक तत्त्व

केंद्रीय जल आयोगाची सूचना

  • ३१ मे धरण क्षमतेच्या १० टक्के

  • ३१ जुलै धरण क्षमतेच्या ५० टक्के

  • ३१ ऑगस्ट ७७ टक्के

  • १५ सप्टेंबर पुढे पडणारा पाऊस हवामान खात्याचा अंदाज घेऊन १०० टक्के

कोयना धरण

  • १० टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • ५२ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • ८०.८५ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • १०५ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • धरण साठा १०० टक्के भरावे.

अालमट्टी धरण

  • १२ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • ६१.५ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • ९४.७१ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • १२३ टीएमसी इतका पाणी साठा असावा

  • धरण साठा १०० टक्के भरावे.

रोगापेक्षा इलाज भयंकर

शिरोळ तालुक्यातील जवळपास ८५ टक्के गावे महापुराच्या विळख्यात सापडतात. आजवरच्या महापुराचा अनुभव लक्षात घेता पंधरा दिवस पाणी गावातच तुंबून राहते. परिणामी, महापुरानंतर शेती, जनावरे, घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. महापुरानंतर आरोग्याची समस्या गंभीर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT