Minister Hasan Mushrif esakal
कोल्हापूर

आलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक, जीवितहानी होणार नाही पण..; काय म्हणाले मुश्रीफ?

पावसाळा (Monsoon Season) सुरू झाला असून, संभाव्य पूर परिस्थितीचा (Kolhapur Flood) धोका टाळण्यासाठी चोख नियोजन करा.

सकाळ डिजिटल टीम

महापूरग्रस्तांना द्यावयाच्या खडकेवाडा, हमिदवाडा, चिखली गावठाण हद्दीमधील प्लॉटबाबत चर्चा झाली.

कोल्हापूर : पावसाळा (Monsoon Season) सुरू झाला असून, संभाव्य पूर परिस्थितीचा (Kolhapur Flood) धोका टाळण्यासाठी चोख नियोजन करा. शिरोळ परिसरात गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाणी पातळी नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे, जीवितहानी होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रश्‍नांच्या आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघन, कागल प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ काळबांडे, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, महापालिका उपायुक्त साधना पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्हा वार्षिक योजनेचा या आर्थिक वर्षातील निधी वेळेत खर्च होण्यासाठी या कामांना प्रशासकीय पातळीवर वेळेत मंजुरी द्या.’ कागल तालुक्यातील करनूर पूरग्रस्त पुनर्वसनासह विविध विषयांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात पूरग्रस्त कुटुंबांची संमती आहे त्यांचे तातडीने पुनर्वसन सुरू करण्याचे सांगितले. महापूरग्रस्तांना द्यावयाच्या खडकेवाडा, हमिदवाडा, चिखली गावठाण हद्दीमधील प्लॉटबाबत चर्चा झाली. पिंपळगाव खुर्द गावठाण विस्तार करण्यासंदर्भात व लिंगायत समाज स्मशानभूमीला जमीन देण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.

आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पातील उर्वरित पुनर्वसन करण्यासंदर्भात व करपेवाडी वर्ग-२ प्रस्तावासंदर्भात आढावा घेतला. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘जिल्हा व शहरातील विविध विकासकामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून प्रशासनाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.’

५६६ घरकुलांना प्रॉपर्टी कार्ड द्या

सेनापती कापशीतील ५६६ ग्रामस्थांची घरे शेतीच्या सातबारामध्ये बांधलेली आहेत. ५० वर्षांत सिटी सर्व्हे झालेला नाही. त्यामुळे कर्ज प्रकरण, तारण, डागडुजी करताना अडचणी येतात. या सर्व घरकुलधारकांचा तातडीने सिटी सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्ड द्या, अशा सूचना मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या.

बेलेवाडी काळम्माच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

कोल्हापूर : बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील शेतकरी कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलकांची भेट घेऊन अन्याय दूर करण्याचे आश्‍वासन दिले. मुश्रीफ यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले. येथे हरी लक्ष्मण पाटील या एकाच नावाच्या तीन व्यक्ती आहेत. त्यामध्ये हरी लक्ष्मण पाटील-श्रावण, हरी लक्ष्मण पाटील -तळपोटे आणि हरी लक्ष्मण पाटील -लांबडीचा असे तिघे आहेत. दरम्यान; हरी लक्ष्मण पाटील -श्रावण यांची मूळ जमीन साडेसात एकर आहे.

परंतु; एकाच नावामुळे उर्वरित दोन शेतकऱ्यांचीही जमीन या एकाच शेतकऱ्याच्या आठ-अ खाती नोंद झाली. साहजिकच १९९९ पासून त्यांची जमीन कागदोपत्री एकूण १४ एकर झाली. चिकोत्रा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी चार एकरच्या स्लॅबनुसार हरी लक्ष्मण पाटील- श्रावण यांची ९३ गुंठे जमीन संपादित होणे कायदेशीर होते. परंतु; प्रत्यक्षात त्यांची एकूण १६० गुंठे जमीन संपादित झाली. हेलपाटे मारूनही दुरुस्ती होत नसल्यामुळे कै. पाटील यांची तिन्ही मुले बाळू हरी पाटील, काळू हरी पाटील, पांडुरंग हरी पाटील हे जिल्हाधिकारी उपोषणाला बसले होते.

शेंडा पार्कमधील जागेसाठी प्रयत्नशील

शेंडा पार्क येथील कृषी आणि आरोग्य विभागाकडील जागा जिल्हा क्रीडा संकुल, प्रस्तावित नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आय टी पार्क व अन्य शासकीय कार्यालयांसाठी मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT