कोल्हापूर - बालिंगा (ता. करवीर) आणि शिवाजी पेठ साकोली कॉर्नर येथील जुगार अड्डयावर करवीर व जुना राजवाडा पोलिसांनी छापे टाकले. याप्रकरणी पोलिसांनी 28 संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, बालिंगा (ता. करवीर) येथे एका घरात सुरु असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले तर पाच जण पसार झाले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल संच, मोटारसायकल असा एकूण 1 लाख 43 हजार 730 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे ः शंकर बापू येळवडे, उमेश कृष्णा गोसवी, विकी काशीनाथ नाळे, किरण अंकूश गोसावी, आकाश गणपती गोसवी, सचिन रामचंद्र गोसावी, अनिल बाळु पडियार, संजय राजाराम वाडकर, चंद्रकांत एकनाथ आयरेकर (सर्व रा. बालिंगा, करवीर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तसेच सरदार हिंदूराव घोडके, दिलीप खोत, शशिकांत चौगले, पांडुरंग वाडकर, संभाजी शिवाजी काटे (सर्व रा. बालिंगा) हे पाच जण पसार झाले. घरमालक गणपती कृष्णात गोसावी (रा. बालिंगा) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात व त्यांच्या पथकाने केली.
दरम्यान, शिवाजी पेठेत पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नागरगोजे व त्यांच्या पथकाने साकोली कॉर्नर येथील दयावान ग्रुपच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असणाऱ्या जुगार अड्डयावर आज दुपारी छापा टाकला. यात 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साडेचार हजाराच्या रोकडसह मोबाईल संच असा एकूण 59 हजार 530 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे - प्रताप शशिकांत देसाई, महेश हिंदुराव चौगुले, दिलीप गणपतराव सुतार, रणजित शामराव सुतार, सतिश पांडुरंग सुतार, सुधाकर नामदेव सरनाईक, समीर वसंतराव वर्णे, सतिश दगडू जाधव, अमित हिंदुराव चौगुले, प्रदीप बबन पाटील, रघुनंदन शामराव सुतार, मानसिंग जयसिंग पोवार (सर्व रा. साकोली कॉर्नर परिसर), सचिन पंडित पाटील (विजयनगर, संभाजीनगर स्टॅंन्ड) परिसर अशी आहेत. यातील प्रताप देसाई हा पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.