कोल्हापूर

गुडाळवाडीत महापुराचे पाणी शिरले! ग्रामस्थांनी केले स्थलांतर

सुरेश साबळे

ग्रामस्थांना पुराच्या वाढत्या पाण्याचा अंदाज आल्याने रात्रीच अनेकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली.

कसबा तारळे (कोल्हापूर): राधानगरी येथील लक्ष्मी तलावाचे स्वयंचलीत दरवाजे अद्याप उघडलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा प्रथमच केवळ तीन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे भोगावतीे नदीला महापूर आला असून कसबा तारळे शेजारी नदीकाठी असलेल्या गुडाळवाडीला या पुराचा मोठा फटका बसला आहे.

मध्यरात्री तीनच्या दरम्यान गुडाळवाडीतील काही घरांच्या मागील बाजूने घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. तर कसबा तारळेकडील पुलाच्या बाजूने मुख्य रस्त्यासह त्या बाजूच्या घरांमध्येहीे पुराचे पाणी घुसले. ग्रामस्थांना पुराच्या वाढत्या पाण्याचा अंदाज आल्याने रात्रीच अनेकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली.

अनेकांनी जवळच्याच गुडाळ गावामध्ये तसेच परिसरात ज्यांचे पै-पाहुणे आहेत, त्यांच्याकडे वास्तव्याला जाणे पसंत केले. तर अनेकांनी गुडाळ येथील गुडाळेश्वराच्या मंदिरात एकत्रितपणे तात्पुरते स्थलांतर केले आहे. गाई-म्हशींची व्यवस्था जेथे जागा मिळेल तेथे करण्यात आली आहे. दरम्यान, गुडाळ येथील खालची गल्ली परिसरातील सुमारे दहा कुटुंबांनी स्थलांतर केले असून पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास तेथील स्थलांतरित कुटुंबांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

केवळ पावसाच्या पाण्यामुळे स्थलांतर करण्याची पहिलीच वेळ

गुडाळवाडीला काही वर्षांतून कधीतरी महापुराचा फटका बसतोच. अतिवृष्टीसह राधानगरी येथील लक्ष्मी तलावातून स्वयंचलित दरवाजांद्वारे भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग हे त्यामागचे कारण असते. कधी कधी धरणाच्या सातही स्वयंचलीत दरवाजांसह मुख्य दरवाजातून पाणी सोडल्यानंतर ही परिस्थिती उद्भवते व नागरिकांना स्थलांतर करावे लागते. परंतु यंदा प्रथमच राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून विसर्ग सुरू नसतानाही केवळ अतिवृष्टी आणि धरणातून विद्युत गृहासाठी होणारा रोजचा चौदाशे क्यूसेकचा विसर्ग यामुळे पाणी पातळी झपाट्याने वाढली आणि या वाडीत पुराचे पाणी शिरले.

कसबा तारळे पुलाचाही गुडाळवाडीला फटका ?

गुडाळवाडी-कसबा तारळे दरम्यान नदीवर झालेल्या मोठ्या पुलामुळे बारमाही वाहतुकीची सोय झाली खरी; परंतु या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या भरावामुळे नदीने पावसाळ्यात आपले पात्रच बदलले असून त्या मुळे गुडाळवाडीत लवकर पाणी शिरते, असे मत ग्रामस्थांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT