Cyber crime sakal
कोल्हापूर

सोशल मीडियाचे अपुरे ज्ञान धोक्याचे

‘सायबर क्राइम’ अनेक क्षेत्रांशी निगडित; सावध राहा, काळजी घ्या

लुमाकांत नलवडे : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : इंटरनेट बॅंकिंग, मनोरंजन, नोकरी, विवाह, व्यवसाय अशा अनेक माध्यमांतून सोशल मीडियाशी जोडलो आहे. त्यामुळे काळजी घेतली नाही, तर फसवणूक होऊ शकते. त्यामुळे तुमचे गेलेले पैसे किंवा अब्रू परत मिळविणे शक्य होत नाही. पोलिसांच्या तपासालाही मर्यादा आहेत. त्यामुळेच सावध राहणे, स्वतः काळजी घेणेच आवश्‍यक आहे. पूर्ण ज्ञानाशिवाय सोशल मीडिया हाताळणे ही धोक्याची घंटा आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रकार

  • सोशल इंजिनिअरिंग

  • फोन, ई-मेल, व्यक्तीशः अशांद्वारे होणारी फसवणूक- येथे पासवर्ड योग्य ठेवा, वारंवार बदला, ओटीपी देऊ नका.

फिशिंग

सोशल मीडिया, बॅंकिंग व एटीएम कार्डस्‌ची माहिती मिळविण्याचा प्रयत्न, मूळ संकेतस्थळासारखे दिसणारे बनावट संकेतस्थळ बनवून ग्राहकांची फसवणूक, संवेदनशील माहिती चोरणे, ईमेल-मॅसेज, फोन मॅसेज वापरून बनावट वेब लिंक पाठवून माहिती चोरण्यात येते. अशी फसवणूक होऊ नये म्हणून संकेतस्थळ खरे आहे काय याची माहिती घ्या, आमिषाच्या एसएमएसला उत्तर देऊ नका, एटीएमचा वापर सावधपणे करा, इतरांकडून त्याचा वापर टाळा.

नोकरीचे आमिष दाखवून

अर्जंट जॉईन करण्याचे आश्वासन, खोटी यादी दाखवून तुम्हाला संधी घेण्यासाठी कमी वेळ असल्याचे दाखवून देणे, नोंदणीसाठी किंवा इतर कामांसाठी आगाऊ रक्कम मागणे, अधिक पगारासह अन्य वचनांद्वारे आश्‍वासने देऊन आकर्षित करणे, लॉटरी लागली आहे, नोकरी लागल्याचे आमिष दाखविणे, जादा पगाराच्या नोकऱ्या, तातडीने अपॉईंटमेंटसारख्या आमिषाला बळी पडू नका.

लग्नाचे आमिष दाखवून

विवाहविषयक संकेतस्थळावरून फसवणुकीच्या उद्देशाने गुन्हेगार खोट्या आकर्षक प्रोफाईल बनवितात. लग्नाचे आमिष दाखवून संबंधित व्यक्तीशी जवळीक करतात. सोशल मीडियावर मैत्री करताना सावधानता बाळगा, अज्ञातास माहिती देऊ नका, समोरील व्यक्तीचे प्रोफाईल तपासून पहा, केवळ अशा प्रोफाईलद्वारे पैशाचे व्यवहार करू नका.

बॅंकिंगविषयी होणारी फसवणूक

कोणतीही बॅंक तुम्हाला फोनवरून माहिती विचारत नाही. केवायसी मागत नाही. अशा फेक कॉलद्वारे तुमच्याकडील माहिती घेऊन तुमची फसवणूक होऊ शकते. लकी ड्रॉ, कुपन किंवा कोणताही फॉर्म भरताना काळजी घ्या. शक्यतो भरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT