कोल्हापूर - दख्खनचा राजा जोतिबाच्या महात्म्यावर आधारित "दख्खनचा राजा जोतिबा' ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोल्हापूर चित्रनगरीत सलग चार वर्षे मालिकेचे शुटींग सुरू राहणार असून चित्रनगरीत भव्य सेट उभारला जाणार आहे. त्याचा भूमीपूजन समारंभ आज निर्माता महेश कोठारे, नीलिमा कोठारे, अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री उर्मिला कोठारे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
दरम्यान, चित्रनगरीत पहिल्यांदाच भव्य सेट उभारला जाणार असून दोन एकर जागेत वाडी रत्नागिरी गाव, श्री जोतिबाचा आणि श्री अंबाबाईचा दरबार आणि आश्रम साकारला जाणार आहे. हा सेटच इतका भव्य असणार आहे की हा सेट पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतील, असा विश्वास यावेळी महेश कोठारे यांनी व्यक्त केला.
यावेळी कोठारे म्हणाले, ""कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे. कोल्हापुरातूनच अनेक सिनेमे आणि मालिका केल्या आणि येथूनच करियरला कलाटणी मिळाली. कोठारे व्हिजन संस्थेच्या माध्यमातून आजवर पौराणिक मालिकांवर भर देण्यात आला असला तरी जोतिबाची मालिका आणखी उंची गाठेल. भव्य सेटबरोबरच मालिकेसाठी वेशभूषा, विविध अलंकार या अतिशय महत्वाच्या गोष्टी असून ही मालिकाही अनेक नवे ट्रेंड निर्माण करेल. कलाकारांची नावे लवकरच जाहीर केली जातील.''
कोल्हापुरात संपूर्ण मालिका शुटींग करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. कोल्हापूर चित्रनगरीत आता सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने या मालिकेचे येथे शुटींग शक्य झाले आहे. शुटींग पूर्ण होताच रोजचे एपीसोड चित्रनगरीतून थेट मुंबईतील स्टुडिओमध्ये अपलोड होणार आहेत. त्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कला दिग्दर्शक संतोष फुटाणे म्हणाले, ""दोन एकर परिसरात सेट लावला जाणार असून जोतिबाचा दरबार साठ बाय शंभर फुटांचा असेल. मी मुळचा कोल्हापूरचाच असून करियरसाठी मुंबईत गेलो. बऱ्याच वर्षापासून कोल्हापुरात नवे काही करण्याची इच्छा होती आणि ती आता पूर्ण होत आहे. या मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरातील शुटींग आणखी वाढतील आणि कोल्हापूरची चित्रपंढरी ही ओळखही नव्याने निर्माण होईल.''
हे पण वाचा - काँग्रेसच्या आणखी एका आमदारांना कोरोनाची लागण
दरम्यान, सेट लावण्यासाठी किमान दीड महिना लागेल आणि त्यानंतर प्रत्यक्ष शुटींगला प्रारंभ होईल. "स्टार प्रवाह' या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.
हे पण वाचा - कोल्हापूर जिल्ह्यात ई-पासची सक्ती कायम ; काय आहे कारण?
लवकरच नवे सिनेमे...
आदिनाथ कोठारेचा "पाणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून उर्मिला कोठारेही काही सिनेमांतून झळकणार आहे. मात्र, सध्या संपूर्ण कुटुंबाचे लक्ष जोतिबा मालिकेवरच अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हिडिओ पाहा
<
>
संपादन- धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.