Increase in KMT bus trips Kalamba to Pethvadgaon kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापूरकरांसाठी गुड न्यूज: केएमटी'च्या बस फेऱ्यांमध्ये वाढ 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या "केएमटी' उपक्रमांतर्गत शहर आणि उपनगरांमधील बस सेवेमध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वाढ केली जात आहे. पाचगाव ते कदमवाडी व पाचगांव ते मध्यवर्ती बसस्थानक या मार्गावर बस सेवा सुरु झाली आहे. त्याशिवाय कळंबा ते शिरोलीमार्गे पेठवडगांव अशी बससेवा पुर्ववत सुरु केली आहे. 


आरकेनगर ते शुगरमिल या मार्गावर प्रती अर्ध्या तासाच्या अंतराने, पाचगाव ते कदमवाडी मार्गावर प्रती 25 मिनिटांच्या अंतराने व कळंबा ते वडगांव मार्गावर (जाता-येता) प्रती अर्ध्या तासाच्या अंतराने प्रवाशांना बस सेवा उपलब्ध होईल. लक्षतीर्थ ते रुकडी- माणगांव बस फेऱ्यांमध्ये वाढ केली असून, गंगावेश ते कागल व्हाया तावडे हॉटेल या मार्गावरील फेऱ्यांमध्येही वाढ केली आहे. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सवलत पास विभाग यापूर्वीच सुरु झाला असून, त्याचा विद्यार्थी व प्रवासी नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवाहन विभागाने केले आहे. 


दरम्यान, मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन झाल्यापासून "केएमटी'ची आर्थिक स्थिती घसरली. आपत्कालीन स्थितीत काही बसेस जिल्हा प्रशासनाच्या सेवेत होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता "केएमटी'ची गाडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. "ना नफा ना तोटा' या तत्वावर चालणारी ही सार्वजनिक वाहतूक अनेकांसाठी आधारवड असून शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतरच उत्पन्नात अपेक्षेप्रमाणे वाढ होणार आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT