An independent Kovid Center should be set up in Kolhapur 
कोल्हापूर

'मुंबई, पुणे, सातारा शहराच्या धर्तीवर कोल्हापुरातही स्वतंत्र कोविड सेंटर उभारावे' 

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - मुंबई, पुणे, सातारा शहरांच्या धर्तीवर कोल्हापूर शहरात स्वतंत्र सुसज्ज कोव्हीड सेंटर उभे करावे, अशा मागणीचे निवेदन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सादर केले. 

शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्ग व मृत्यूदर झपाट्याने वाढत असून, उपचाराविना अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनावर मर्यादा येत असल्यामुळे ही मागणी केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की मार्च, एप्रिल, मे महिन्यात आटोक्‍यात असणारी परिस्थिती सध्या आटोक्‍याबाहेर गेल्याचे दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि उपचार केंद्रांची कमतरता यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अनेक रुग्ण उपचारा अभावी दगावत आहेत. वाढती रुग्ण संख्या आटोक्‍यात आणण्याकरिता योग्य उपाययोजना करण्याबाबत वेळोवेळी प्रशासनासोबत बैठका घेवून सूचना केल्या आहेत. नियोजनबद्ध यंत्रणेतून कोरोना रुग्णसंख्या आटोक्‍यात आणण्यास मदत होणार आहे. राज्यातील मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये प्रशासनाच्या नियोजनामुळे परिस्थिती आटोक्‍यात आली आहे. 

मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र कोरोना (कोविड) सेंटर उभारले आहेत. त्याचप्रमाणे सातारा शहरातही अशाच पद्धतीचे कोविड सेंटर उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून, त्याच्या उभारणीचे काम तातडीने सुरु होत आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात वाढता संसर्ग पाहता सी.पी.आर. सह इतर रुग्णालयांवर असणारा रुग्णसेवेचा ताण पाहता स्वतंत्र कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याकरिता मुंबई, पुणे, सातारा शहराच्या धर्तीवर शहरात स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यास परवानगी देवून त्यास निधी मंजूर व्हावा. 

 .

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT