Indian government ban on Chinese apps impact for indian students online education difficult 
कोल्हापूर

चिनी ॲपला बंदी मात्र भारतीय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात या अडचणी

आकाश खांडके

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधील वुहान शहरात सुरू झाला. ही बातमी झपाट्याने सर्वत्र पसरली. त्या वेळेस काही भारतीय विद्यार्थी वुहानमधील विद्यापीठात उच्च शिक्षण घेत होते. चीनमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या. त्यामुळे विद्यार्थी मायदेशी परतले. त्यानंतर काही दिवसांत भारतात लॉकडाऊन जाहीर झाला. जानेवारीमध्ये परतलेले विद्यार्थी सप्टेंबर उजाडला तरी इथेच आहेत. भारत सरकारने चिनी ॲपवर बंदी घातल्याने ऑनलाईन शिक्षणाचा त्यांचा मार्ग खडतर झाला आहे. त्याचा फटका भारतात परतलेल्या सम्मेद पाटील व कुलदीप चव्हाणला बसत आहे.


हातकणंगलेचा सम्मेद २०१९ पासून वुहानमध्ये उच्च शिक्षणासाठी स्थायिक होता. दोन तीन दिवस आधी तो हिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मायदेशी परतला. तो सांगतो, ‘‘जानेवारीतील कडाक्‍याची थंडी माझ्यासाठी नवी होती. या वातावरणात काही दिवसांत सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. लक्षणे न्यूमोनियासारखी असल्याने या आजाराची साथ आल्याच्या चर्चेने जोर धरला. स्थानिक पातळीवर कार्यरत यंत्रणेने नागरिकांना दवाखान्यात उपचार घेण्यास प्रोत्साहित केले.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वसतिगृहावरच राहण्याच्या सूचना दिल्या. दिवसागणिक परिस्थिती खालावत गेली. माझे हिवाळी सुट्टीत भारतात परतण्याचे पूर्वनियोजन होते. त्यानुसार १७ जानेवारीला तिथून निघालो. काही दिवसांतच वुहान लॉकडाऊन झाले. सुट्टी संपल्यावर परतण्याचा विचार होता पण भारतात कोरोना पसरला व लॉकडाऊन जाहीर झाले. परत जाणे शक्‍य नव्हते. या भयानक परिस्थितीत मी घरी आहे याचे समाधान वाटते.’’


कुलदीपने पाच-सहा महिने वुहानमध्ये वास्तव्य केले. जानेवारीत असणाऱ्या हिवाळी सुट्टीसाठी तो भारतात परतला. कोरोना प्रादुर्भावामुळे परत जाण्याचे मार्ग बंद झाले. सुरवातीला ऑनलाइन अभ्यास सुरू होता. चिनी ॲप बंद झाल्याने त्याचे ऑनलाइन शिक्षण थांबले. विद्यापीठाबरोबर थेट संपर्क होत नसल्याचे तो म्हणाला. 


तो म्हणतो, ‘‘चीनमध्ये लॉकडाऊन पुकारला गेला. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अत्यावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला. परिस्थिती आटोक्‍यात आल्यावर ऑनलाईन क्‍लास सुरू झाले. चिनी ॲपवरील बंदीने ऑनलाईन क्‍लासला खीळ बसली आहे. सध्या विद्यापीठाबरोबर संपर्क साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मित्रांची मदत घ्यावी लागत आहे. शिक्षण परत कधी सुरू होणार, हा प्रश्न पडलाय.’’

संपादन -  अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT