shivaji university  sakal
कोल्हापूर

प्रा. डेळेकर यांच्या संशोधनास भारतीय पेटंट; रंगांसाठी नॅनो संमिश्रांचे संशोधन

सूक्ष्मजीव जंतूच्या प्रसारामुळे अनेकवेळा रुग्ण दवाखान्यात एका आजारासाठी प्रवेश घेतो

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील(shivaji university) रसायनशास्त्र विभागातील प्रा. एस. डी. डेळेकर आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रा. शामकुमार देशमुख यांना ‘अँटीमायक्रोबियल रंगांसाठी नॅनो संमिश्रे’ संशोधनास भारतीय पेटंट मिळाले आहे. मानवाच्या दैनंदिन जीवनात जीवाणू, विषाणू, बुरशी आदी सूक्ष्म जीवजंतू सर्वत्र आढळतात. पोषक वातावरणात हे सूक्ष्मजीव जंतू त्वरित पुनरुत्पादित होतात. त्यामुळे वातावरणात दुर्गधी, अस्वच्छता पसरते. तसेच हे सूक्ष्मजीवजंतू मानवी शरीरामध्ये प्रवेश करुन अनेक संसर्गजन्य आजार होतात.

सूक्ष्मजीव जंतूच्या प्रसारामुळे अनेकवेळा रुग्ण दवाखान्यात एका आजारासाठी प्रवेश घेतो; परंतु काहीवेळा तो सूक्ष्मजीव जंतूच्या संसर्गजन्य आजारामुळे दगावतो. मधुमेही, रक्तदाबाच्या रुग्णांना अशा सूक्ष्मजीवजंतूचा संसर्ग लवकर होऊन त्यांची प्रतिकारक्षमता कमी होत असते.कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या विविध संसर्गजन्य आजारांची प्रचिती सारे अनुभवत आहेत. म्हणून या सूक्ष्मजीवजंतूचा पृष्ठभागावरील होणारा प्रसार अन्‌ पुनरुत्पादन रोखण्यासाठी प्रा. डेळेकर यांनी अँटीमायक्रोबियल रंगांसाठी संशोधनातून नॅनो संमिश्रे तयार केली.

अशा रंगाचे आवरण घरातील आणि दवाखानातील(hospital) विविध वस्तूंना दिल्यास त्या वस्तूंच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीवजंतू नष्ट होऊन त्यांचा प्रसारही होत नाही. त्यामुळेच विविध संसर्गजन्य आजारांचा अटकाव होऊ शकतो. हा रंग घर, कार्यालये, दवाखान्यातील विविध उपकरणे, कॉट, दरवाजे, कपाटे, टेबल, खुर्चीसाठी वापरु शकतो. वाहनांवर रंगाचे आवरण दिल्यास ते पृष्ठभागही जंतुविरहीत होऊ शकतात. डॉ. डेळेकर यांनी संशोधित केलेले नॅनो संमिश्रे ही दीर्घकालीन अँटीमायक्रोबियल (Antimicrobial)गुणधर्म असलेले पदार्थ असून ते पूर्ण सुरक्षित, पर्यावरणपूरक आहेत. या संशोधनाचे श्रेय त्यांनी शिवाजी विद्यापीठ (shivaji university)आणि विद्यार्थ्यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

Neeraj Chopra CWG26: नीरज चोप्राने पाकिस्तानी अर्शद नदीमवर कुरघोडी केली, पण ८४ मीटरचे पात्रता अंतर गाठण्यात अपयशी; फायनलमध्ये पोहोचला की नाही?

School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

सलमान खानने विकला कोट्यवधींचा फ्लॅट; तरीही हातात पडला फक्त 'एवढाच' नफा!

Latest Marathi News Live Update : खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये पाच जणांचे बळी, प्रशासनाला आली जाग

SCROLL FOR NEXT