Accused arrested sakal
कोल्हापूर

उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : उद्योगपती संजय घोडावत (sanjay Ghodawat)यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. रमेशकुमार प्रजापती ठक्कर असे त्याचे नाव आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील लॉजवर ही कारवाई करण्यात आली. रमेशकुमार याच्याकडून एक लाख रुपये रोख व पंधरा हजारांचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार व्ही. पी. सिंग अद्याप बेपत्ता आहे.(industrialist-sanjay-ghodawat-intimidates-arrested-crime-case-kolhapur)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

उद्योगपती संजय घोडावत यांना मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून धमकीचे फोन येत होते. त्यांचे व्यावसायिक भागीदार नीलेश बागी यांनाही फोन करून धमकावण्यात आले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कुटुंबाचे बरेवाईट होईल, असे सांगितले होते.

याबाबतची फिर्याद घोडावत यांनी पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी तपास करून रमेशकुमार याच्याशी संपर्क केला. मुंबईमधील सीएसटीजवळ एका लॉजमध्ये पैसे घेऊन येण्यास त्याने सांगितले. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी रमेशकुमार याला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार बेपत्ता असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT