The Industry Minister Said, Prepare A Proposal For GI Rating Of Cashew Nuts In Chandgad, Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

चंदगड, आजऱ्यातील काजूच्या जीआय मानांकनसाठी प्रस्ताव तयार करा, "या' मंत्र्यांनीकेली सुचना

सुनील कोंडुसकर

चंदगड : चंदगड व आजरा तालुक्‍यातील काजूचे जीआय मानांकन करून घेण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, अशी थेट सुचना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. जीआय मानांकन मिळाल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणे शक्‍य होणार आहे. घनसाळला हा दर्जा मिळाला आहे. त्यापाठोपाठ या विभागातील काजू हे दुसरे पिक पात्रता स्पर्धेत यशस्वी झाल्यास या विभागाचे महत्व वाढणार आहे.

 कोकण आणि घाटमाथ्यावरील काजू प्रक्रीया उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार राजेश पाटील यांच्या पुढाकाराने दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत व्हीडीओ कॉन्फरन्स झाली. या वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या काजू बीच्या दराबद्दल मुद्दा उपस्थित केला.

जीएसटी परतावा व अन्य सवलती उद्योजकांना मिळतात. शेतकऱ्याला त्याचा लाभ होत नाही. काजू बीच्या दराचा प्रश्‍न गेल्या काही वर्षापासून गंभीर होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या विभागातील काजू बीचे पृथ्थकरण करण्यात आले असून ती चवीला रुचकर आहे. कार्बोदकांचे प्रमाणही जास्त आहे. कोकणातील काजू पेक्षाही ती अधिक दर्जेदार आहे. परदेशातून येणाऱ्या काजूपेक्षा तिचा स्तर अधिक वरचा असून दीर्घकाळ टिकावू असल्याचे निदर्शनास आणले. उद्योगमंत्री देसाई यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. या दोन्ही तालुक्‍यातील काजू बीचे जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करावे, अशी सुचना केली. 

हमीभाव मिळावा
काजू बीच्या दराबाबात आम्ही आग्रही आहोत. उद्योजकांना सवलती दिल्या त्याचे स्वागत आहे. परंतु शेतकऱ्यांसाठीही निर्णय घ्यायला हवा. बी ला हमीभाव मिळावा ही मागणी आहे. उद्योगमंत्र्यांनी बीच्या वेगळेपणाची दखल घेऊन जीआय मानांकनाबाबत आश्‍वस्थ केले आहे. त्याचे स्वागत करतो. 
- नितीन पाटील, बळीराजा शेतकरी संघटना 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Latest Marathi News Updates : आरोग्य मंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या सुरक्षेत मोठी चूक...

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Nagpur Accident: नागपूरच्या गिट्टीखदान चौकात शिवशाही बसच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT