Is this information about the solar eclipse on Sunday  
कोल्हापूर

रविवारी होणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल 'हे' माहिती आहे का?  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - यंदा चार चंद्रग्रहणे तर दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. दोन चंद्रग्रहणे दहा जानेवारी व पाच जूनला झाली. दोन सूर्य ग्रहणांपैकी पहिले सूर्यग्रहण रविवारी (ता.21) होणार आहे. कोल्हापुरातील ग्रहणाची सुरुवात सकाळी दहा वाजून तीन मिनिटांनी होणार आहे. त्याचा मध्यकाळ अकरा वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे, ग्रहण एक वाजून 28 मिनीटांनी संपणार आहे. या ग्रहणाचा कालावधी तीन तास पंचवीस मिनिटे व 31 सेकंद इतका राहणार असल्याची माहिती विवेकानंद कॉलेजच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले. 

भारत, नेपाळ ,पाकिस्तान, सौदी अरेबिया, यूएई, इथोपिया, कॉंगो यांच्या काही भागामधून काही सेकंदासाठी "रिंग ऑफ फायर' चा अनुभव घेता येणार आहे. भारताचा विचार केला तर डेहराडून, सिरसा आणि तेहरी या ठिकाणाहून 38 सेकंदापर्यंत कंकणाकृती म्हणजेच "रिंग ऑफ फायर' सूर्यग्रहणाचा आनंद घेता येणार आहे. कंकणाकृती ग्रहणामध्ये चंद्राची सावली सूर्याला 99 टक्केपर्यंत झाकते व त्यामुळे सूर्य हा काही सेकंदापर्यंत कंकणासारखा दिसतो. कोल्हापूरमधून मात्र कंकणाकृती ग्रहणाचा आनंद घेता येणार नाही. कोल्हापूरमध्ये खंडग्रास सूर्य ग्रहण होणार आहे. 


सूर्यग्रहणासाठी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येत असतो. चंद्र मध्ये आल्यामुळे चंद्राची सावली ही आपल्या पृथ्वीच्या ज्या भुभागावरती पडते तेथून सूर्यग्रहण बघता येत असते. सूर्यग्रहण बघताना नुसत्या डोळ्यांनी बघू नये तर काळा चष्मा अथवा फिल्टर्सचा वापर करावा. ग्रहणे म्हणजे सावल्यांचा खेळ असतो. त्यामुळे कुठलीही अंधश्रद्धा पाळू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: विवाहित महिलेचा पतीसोबत वाद, सल्ला घेण्यासाठी खरातकडे गेली असता... ; अशोक खरातवर रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : वीज दर कपातीचा ग्राहकांना दिलासा; पुढील चार वर्षांत सरासरी नऊ टक्क्यांपर्यंत घट शक्य

Sangli Collector Transfer : सांगली जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली, अशोक काकडेंच्या जागी तरूण व्यक्तीस संधी

Chhatrapati Sambhajinagar: सोळा लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार ; दोन सराफांसह घरमालकाला चुना

Chhatrapati Sambhajinagar: संतप्त रिक्षाचालक उतरले रस्त्यावर ; गॅससाठी रात्रीपासून रांगा लावाव्या लागल्याने संताप; पोलिसांनी केली मध्यस्थी

SCROLL FOR NEXT