Information boards erected by the city traffic control branch; Trying to overcome the dilemma 
कोल्हापूर

शहर वाहतूक नियंत्रण शाखेने उभारले  माहिती देणारे फलक ; कोंडी दूर करण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. पार्किंगची ठिकाणे माहीत नसल्याने अशा पर्यटकांची वाहने रस्त्यावरच पार्क झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. हे टाळण्यासाठी आता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहराच्या मुख्य चौकात पार्किंगची ठिकाणे दर्शविणारे फलक लावले आहेत. 
दिवाळी सुटीनंतर शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दररोज पर्यटकांची हजारो वाहनांची ये-जा असते. या पर्यटकांना बिंदू चौकातील पार्किंग व्यतिरिक्त अन्य पार्किंगच्या ठिकाणी माहिती नसते. परिणामी ही वाहने रस्त्यावर लावली जातात. अशा वाहनांवर कारवाई केली जाते; पण या वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. सध्या वाहतुकीच्या नियोजनावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी नियोजन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील मुख्य चौकात पार्किंगच्या ठिकाणांची माहिती देणारे फलक लावले आहेत. 

29 ठिकाणी हे फलक लावले 
शहरात कोल्हापूर पोलिस दल व महापालिकेतर्फे दसरा चौक, व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, नागाळा पार्क, शंभरफुटी पार्किंग तळ, छत्रपती शिवाजी स्टेडियम, गांधी मैदान अशा या ठिकाणी पर्यायी पार्किंगची सुविधा आहे. याची माहिती पर्यटकांना देणारे फलक बिंदू चौक, कोंडा ओळ, आझाद चौक, दिलबहार तालीम, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, खानविलकर पेट्रोल पंप, व्हीनस कॉर्नर, अशा 29 ठिकाणी हे फलक लावले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT