write sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : वास्तववादी लेखनासाठी आतला आवाज ऐका

डॉ. किरण गुरव : उलगडला आजवरच्या साहित्य लेखनाचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘‘आजचा वाचक हा उद्याचा लेखक असतो. स्वतः चांगलं लिहिणं, हा सर्वात मोठा पुरस्कार असतो. मात्र, वास्तवाला भिडणारं लिखाण होण्यासाठी नवसाहित्यिकांनी आतल्या आवाजाला साद घातली पाहिजे, असे स्पष्ट मत साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक, शिवाजी विद्यापीठाचे अधीक्षक डॉ. किरण गुरव यांनी व्यक्त केले. ‘सकाळ’च्या ‘कॉफी वुईथ सकाळ’(Coffee with Sakal) या उपक्रमांतर्गंत त्यांनी सकाळ परिवारातील सदस्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुळात मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या डॉ. गुरव यांचा साहित्य प्रवास सुरू झाला तो स्वानुभावतूनच. पण, या साऱ्या गोष्टींकडे तटस्थपणे पहात त्यांचा हा लेखन प्रपंच विस्तारत गेला आणि तो वाचकप्रिय होतानाच विविध पुरस्कारांचा मानकरीही ठरला. या सारा प्रवास यानिमित्ताने उलगडला.

मुळात घरच्यांपासून लपून वाचणारा मी वाचक होतो. कारण दिवाळी अंक आणि शेतातली सुगीची धांदल एकाचवेळी असायची आणि मग लपूनच जागा मिळेल तिथे बसून पुस्तके, दिवाळी अंक वाचत बसायचो. दहावीला चांगले गुण मिळाल्यानंतर घरच्यांनी इंजिनिअर करायचं ठरवलं आणि ‘डीएमई’ केलं. मग, विविध औद्योगिक आस्थापनातून प्रवास सुरू झाला आणि पुढे या प्रवासातील अनुभवांच्या शिदोरीवरच लेखनाची प्रेरणा मिळाली. ‘जुगाड’ ही कादंबरी याच अनुभवविश्वावर आधारित आहे. मात्र, अनुभव मांडणं म्हणजे कादंबरी नसते तर ती वाचकाला जिवंत वाटणारी असावी लागते, असेही डॉ. गुरव सांगतात.

विविध प्रकारचे साहित्य, वाचनसंस्कृती आणि प्रकाशकांची भूमिका या प्रश्नावर ते सांगतात, ‘‘सुरुवातीच्या काही लेखनानंतर माझी मला भाषा सापडली आणि आता तरी भाषा म्हणजे मन, अशीच व्याख्या मी करतो. लेखनातही स्वतःची वाट स्वतःच निवडायची असते आणि चांगल्या लेखनाची वाचक, प्रकाशक कदर करतात. त्यासाठी स्वतः स्वतःचे समीक्षण करण्याचीही गरज असते. वाचन संस्कृतीचा एकूणच विचार करता प्रत्येकाने जे उपलब्ध असेल ते वाचलं पाहिजे. चांगला वाचक निर्माण होणं ही आता गरज आहे.’’ (kolhapur news)

पुरस्कारप्राप्त ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ कथासंग्रहाबद्दल ते सांगतात, ‘‘कथा हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ हा कथासंग्रह खेड्यातील तमाम तरुणांना आपलासा वाटतो. कारण या कथेतील बाळू त्यांचा प्रतिनिधी आहे. शिक्षणासाठी खेड्यातून शहरात आल्यानंतर त्याचे स्थलांतर हे हळूहळू मानसिक अवस्थांतर बनते. हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. भविष्यात कथा मी लिहिणारच आहे. पण, ‘गस्त’ या कादंबरीवर सध्या काम सुरू आहे. एका गावात बाहेरून रात्रीचे दगड पडतात आणि त्या घटनेवर आधारित ही रहस्यमय कादंबरी असेल.’’दरम्यान, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते डॉ. गुरव यांचा सत्कार झाला. निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी स्वागत केले.

‘सकाळ’ने दिले लेखनाचे बळ

माझ्या ‘इस्तू’ या पहिल्या कथेला ‘सकाळ’नेच प्रसिद्धी दिली होती. पुढे ‘साप्ताहिक सकाळ’च्या कथा स्पर्धेत सहभागी होऊ लागलो आणि त्यातही बक्षिसे मिळाली. २००१ ला ‘गावकी’ या कथेला पारितोषिक मिळाले. एकूणच लेखन प्रवासात ‘सकाळ’ने नेहमीच बळ दिल्याचेही श्री. गुरव यांनी आवर्जुन सांगितले.

साहित्यिकांनी भूमिका घ्यावीच

अलीकडच्या काळात समाजातील वर्तमानावर साहित्यिक, कलाकार स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीत, या प्रश्नावर डॉ. गुरव म्हणाले, ‘‘साहित्यिकाने स्पष्ट भूमिका घेतलीच पाहिजे. कारण साहित्यिक म्हणून समाजात तुमची वेगळी ओळख असली तरी समाजापासून तुम्ही वेगळे असू शकत नाही. साहित्याला सध्या एक वेगळाच आयाम मिळत आहे. तसे प्रयत्नही सुरू आहेत. साठोत्तर साहित्याची चर्चा ऐंशीच्या दशकात सुरू झाली. त्यामुळे सध्याच्या साहित्याची चर्चा आणखी किमान दहा वर्षांनी नक्कीच होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock : 'या' एका स्टॉकने गुंतवणूकदारांची केली चांदी! तुमची १ लाखाची गुंतवणूक आज झाली असती ६४ लाख रुपये...

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

Video : अर्जुन स्वतःच्या जीवाशी खेळून महिपतला पोलिसांच्या हवाली करणार ! नव्या ट्विस्टने प्रेक्षकही चकित

Mumbai Election : भाजपमधून  26  बंडखोरांची हकालपट्टी; मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांची कारवाई, सहा वर्षांसाठी पक्षातून केलं निलंबन

Whatsapp : पालकांसाठी खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपची लपवा-छपवी संपणार; तुमची मुलं काय करतात, कुणाशी बोलतात सगळं कळणार, नवीन फीचर काय आहे पाहा

SCROLL FOR NEXT