Inquiry into the incident at Jadhavwadi Wireman death case after falling from a pole 
कोल्हापूर

‘महावितरण’लाच धक्का देणारा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जाधववाडी येथे काल झालेल्या अपघातामुळे महावितरणच्या लाईनमनची सुरक्षिततता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. अपघाताची आता त्रयस्थ समितीमार्फत चौकशी होणार आहे. 


कालच्या घटनेमुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली. प्रकाश भोसले यांचा खांबावरून पडून मृत्यू झाला. महावितरणच्या इतिहासात अशा प्रकारचा अपघात दुर्मिळ समजला जातो. हा इलेक्‍ट्रीकल अपघात नसून तो मेकॅनिकल अपघात असल्याचे मानले जाते. अर्थात चौकशी समितीच्या अहवालातच या बाबी स्पष्ट होतील. तीन लाईन ओढून झाल्यानंतर चौथी लाईन ओढताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, ज्या पद्धतीने ही घटना घडली, ती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने तसेच भोसले यांच्या नातेवाईकांसाठी धक्कादायक अशी होती.


एखाद्या भागात वीज पुरवठा खंडित झाल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे बिघाड झाल्यास वायरमन मंडळी जीव धोक्‍यात घालून काम करतात. महावितरणच्या स्तरावर सुरक्षेची सर्व साधने पुरविली जातात. प्रत्येक गोष्ट जीवावर बेतणार असल्याने कर्मचारी काळजी घेऊनच काम करतात. वीज ही अत्यावश्‍यक बाब बनली आहे. काही मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला तरी अनेकांचा जीव टांगणीला लागतो. महावितरणसमोर सध्या वीज बिलाच्या वसुलीचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. लॉकडाउनमधील बिलात सवलत मिळेल, या आशेवर लोक बसले. आता बिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ती वसूल कशी करायची, असा प्रश्‍न असताना कालच्या घटनेला अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. 

अपघाताच्या प्रमाणात घट
विजेच्या अपघाताच्या प्रमाणात अलीकडे घट झाली होती. त्यामुळे कर्मचारी घेत असलेली खबरदारी आणि त्यांना पुरविली जाणारी सुरक्षिततेची साधने ही कारणे होती. पूर्वी खांबावरून पडून वायरमनचा मृत्यू अशा आशयाच्या बातम्या कानी पडायच्या. सकाळी कामाला निघतानाच वायरमनच्या कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागायचा. विजेचे काम धोकादायक असल्याने कधी काय होईल याचा नेम नाही. तरीही लाईनमन खबरदारी घेऊन काम करतात. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT