Inspection of 126 Houses In Ajara Kolhapur Marathi News
Inspection of 126 Houses In Ajara Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

तापसदृश साथीमुळे आजऱ्यात 126 घरांची तपासणी

रणजित कालेकर

आजरा : आजरा शहरात तापसदृश साथीचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने शहरात सर्वेक्षण मोहीम राबविली आहे. डेंगीचे रुग्ण आढळत असल्याची चर्चा शहर परिसरात असल्याने आरोग्य यंत्रणेकडून पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. गेले चार दिवसांत 126 घरांची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. 

शहरात आमराई गल्ली परिसरात तापसदृश साथ पसरली आहे. अनेक जण आजारी पडल्यामुळे सरकारी व खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. या चार दिवसांत शहरातील 126 घरांची तपासणी केली आहे. 1116 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये तापाचे रुग्ण आढळले नाही. या वेळी पाणी साठवणाऱ्या टाकींची तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन हौदात डेंगीच्या अळ्या सापडल्या.

यामध्ये अबेटिंग टाकण्यात आले. हौदाची तपासणी, परिसर स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छतेबरोबर गटारी वाहते करण्यास नागरिकांना आवाहन करण्यात आले. आरोग्य कर्मचारी व आशा गटप्रर्वतक यांनी सर्वेक्षणमध्ये सहभाग घेतला. या वेळी आरोग्य विषयक सूचना दिल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, विस्तार अधिकारी ए. जी. काटकर, आरोग्य सहायक जनार्दन भोयीर, जे. एच. साबखान, प्रशांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. 

"आरोग्य'कडून नगरपंचायतीला पत्र 
आजरा शहरातील आमराई गल्ली, चर्मकार गल्ली व विठ्ठल मंदिर परिसरात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे साथ उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी विविध उपाययोजनांची अमलबजावणी नगरपंचायतीने करावी, असे पत्र आरोग्य विभागाकडून नगरपंचायतीला दिले आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT