The Inspiring Battle Of The Old Lady In Kaulage Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

'आयसीयू'तच गाठले कोरोनाने, तरीही मात केली जिद्दीने!...कौलगेतील वृद्ध महिलेची प्रेरणादायी लढाई

अवधूत पाटील

गडहिंग्लज : "त्यांनी' वयाची पंचाहत्तरी गाठलेली. मेंदूच्या आजारामुळे येथील आयसीयूत उपचार सुरू होते. दुर्दैवाने याच आयसीयूत "त्यांना' कोरोनाचा संसर्ग झाला. वाढते वय आणि इतर आजाराची लागण असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. पण, या वयातही त्यांनी हार मानली नाही. कोरोनावर जिद्दीने मात करीत "त्या' सुखरूप घरी पोचल्या. कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील वृद्ध महिलेने प्रतिकूल परिस्थितीत कोरोनाविरुद्ध दिलेली ही लढाई इतरांसाठी प्रेरणादायीच म्हणावी लागेल. 

लॉकडाउनसह अनेक उपाययोजना करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातही दहा वर्षांखालील मुले व 50 वर्षांवरील लोकांना त्याचा अधिक धोका संभवत आहे. तसेच दुर्धर आजार असतील तर अधिक काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. जिल्ह्यातील सुमारे एक हजार रुग्ण 50 वर्षांवरील आहेत. ही संख्या एकूण रुग्णांच्या तुलनेत 25 टक्के आहे. 

कौलगे येथील सदरच्या वृद्ध महिला यातीलच एक. मेंदूवरील आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना आयसीयूत दाखल केले. पण, दुर्दैवाने याच ठिकाणी काम करणारे कर्मचारी कोरोना बाधित आढळले. सदरची महिला डिस्चार्ज घेऊन घरी आल्या आणि दोन दिवसांनी ही बाब समोर आली. त्यामुळे त्यांचाही स्वॅब घेतला. तो पॉझिटिव्ह आला. जोखमीचा रुग्ण म्हणून कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलविण्यात आले. 18 दिवस त्यांच्यावर उपचार केले. या उपचारांना साथ देत त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीतही कोरोनाविरुद्धची लढाई मोठ्या जिद्दीने जिंकली. 

कोरोनाची लागण होऊ नये, याची खबरदारी घेतलीच पाहिजे. त्यातही जोखमीच्या वयातील, दुर्धर आजारी लोकांनी तर अधिक काळजी घ्यायला हवी. पण, त्यातूनही दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग झालाच तर घाबरून न जाता जिद्दीने पुढील लढा दिला पाहिजे. हाच धडा या वयोवृद्ध महिलेने घालून दिला असेच म्हणावे लागेल. 

मुलगा-सुनेसह चौघेही झाले बरे... 
संबंधित वृद्धेला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांचेही स्वॅब घेतले होते. यातील मुलगा, सून, पंधरा वर्षीय नात व अकरा वर्षीय नातू असे चौघेही कोरोना बाधित आढळले. मात्र, उपचारानंतर हे चौघेही कोरोनामुक्त होऊन घरी सुखरूप परतले आहेत. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT