Instructions To Plan For Possible Flooding Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

संभाव्य पूराबाबत सात दिवसांत आराखडा करण्याच्या सूचना 

सकाळवृत्तसेवा

शिरोळ : शिरोळ तालुक्‍यामध्ये संभाव्य पूर परिस्थिती उद्‌भवल्यास, पूरबाधित नागरिकांना राहण्याची सोय, जनावरांचे संभाव्य स्थलांतर याबाबत स्थानिक पातळीवरती, गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी सात दिवसांमध्ये कृती आराखडा तयार करून, प्रशासनास सादर करावा, असे आदेश तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांनी संबंधितांना दिला आहे. 

तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तलाठी, मंडल अधिकारी यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये बोलताना, तहसीलदार मोरे-धुमाळ म्हणाल्या, ""सन 2019 मध्ये महापूर उदभवल्यानंतर तालुक्‍यातील 39 गावांमधील अनेक कुटुंबांना तसेच जनावरांना महापुराचा फटका बसला. या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्‍यातील प्रत्येक गावामध्ये महापुराची इशारा पातळी निश्‍चित करण्यात आली आहे.

आगामी काळात महापूर उद्‌भवल्यास आणि महापुराने इशारा पातळी गाठल्यास, प्रशासनाची तारांबळ उडेल हा धोका समोर ठेवून प्रत्येक गावामधील महापुराने बाधित होणार नाही अशी सुरक्षित जागा निश्‍चित करावी या ठिकाणी संबंधित नागरिकांना तसेच जनावरांना राहण्याकरिता नागरिकांना सूचना द्याव्यात. गावातील सर्व प्रकारच्या दुकानदारांनी आप आपले साहित्य सुरक्षितस्थळी हालविण्यासाठी त्यांनी स्वतः जागा निश्‍चित करावी.

संभाव्य महापूर येण्यापूर्वीच एसटी बसेस, तसेच अन्य वाहनांची सोय ज्या-त्या परिसरात करण्यासह प्रत्येक गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांनी ज्या त्या गावचा कृती आराखडा सात दिवसांत तयार करावा.'' या बैठकीस निवासी नायब तहसीलदार पी. जी. पाटील, संजय काटकर, गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह विविध खात्याचे प्रमुख उपस्थित होते. 

दबावाला बळी पडू नका 
महापूर उद्‌भवल्यास व नागरिकांचे प्रापंचिक साहित्य व शेतीचे नुकसान झाल्यास त्याबाबतचा वस्तूनिष्ठ पंचनामा करताना लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन मोरे धुमाळ यांनी केले. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT