interested candidate for municipal corporation election list of voters last stage in kolhapur 
कोल्हापूर

महापालिका रणधुमाळी : मतदार यादीचे काम अंतिम टप्प्यात; निवडणूक आयोगाकडे इच्छुकांचे लक्ष

डॅनियल काळे

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आता लक्ष्य लागून राहिले आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होताच, निवडणुकीची तारीखही जाहीर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आता निवडणुकीच्या तारखेच्या प्रतीक्षेत आहे. 

एवढी तयारी करून निवडणुका जर पुढे पुढे जाउ लागल्या तर ते उमेदवारांच्या तयारीवर पाणी पडल्यासारखे होणार असल्याने उमेदवार आता निवडणुकीच्या तारखेची वाट पाहत आहेत.
महापालिका निवडणुकीची चर्चा गेली पाच महिने सुरू आहे. कोरोनाचा फटका या निवडणुकीला बसल्याने निवडणूक लांबली आहे. दरम्यानच्या काळात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बहुतांश निवडणूकपूर्व प्रक्रिया आता पार पडली आहे. २१ डिसेंबरला आरक्षण सोडत आणि प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली. त्यानंतर अंतिम प्रभागरचनाही जाहीर झाली. त्यानंतर मतदार याद्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध झाला.

अंतिम मतदार याद्यांचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मोहर त्यावर लागणार आहे. ही मतदार यादी प्रसिद्ध होताच निवडणूक कार्यक्रमाचीच प्रतीक्षा लागणार आहे. निवडणूक कार्यक्रम तीस दिवस अगोदर जाहीर करावा लागतो. त्यामुळे येत्या आठ दिवसात जर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली तर पुढच्या महिन्यभरात म्हणजे एप्रिलअखेर किंवा मे महिन्याअखेरपर्यंत निवडणुक कार्यक्रम लागण्याची शक्‍यता आहे. एवढ्या मुदतीत जर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही तर मात्र पावसाळ्यानंतरच निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आता फार गाजावाजा न करता एकेक मतदाराला जोडण्याचे काम हाती घेतले आहे. हळूहळू प्रभागात आपले वातावरण तयार करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT