Interior Design Department in Cyber ​​Women
Interior Design Department in Cyber ​​Women 
कोल्हापूर

घर, क्‍लिनिक आणि कॅफेचे खुलवले सौंदर्य 

नंदिनी नरेवाडी

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) : तुळशी वृंदावनपासून अगदी घरातील देव्हारापर्यंत आणि क्‍लिनिकपासून कॅफे पर्यंतचे डिझाईन्स येथील विद्यार्थिनी साकारत आहेत. सायबर वुमेन्स मधील इंटिरियर डिझाईन विभागात शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थिनी पहिल्या वर्षापासूनच इंटिरिअर डिझायनिंग मधील विविध संकल्पना सत्यात उतरवू लागल्या आहेत. फक्त कोल्हापुरातच नव्हे तर कोकणातही त्यांनी बनविलेल्या या डिझाइन्सला मागणी वाढू लागली आहे. 

उपलब्ध जागेचा इंच न्‌ इंच उपयोगात आणतानाच त्याचे सौंदर्यशास्त्र जपण्याचा प्रयत्न इंटिरिअर "डिझायनिंग' मध्ये करण्यात येतो. हेच कौशल्य वापरून सायली देसाई हिने परफेक्‍ट बेडरूमचे डिझाईन बनवले आहे. तिचे हे डिझाईन्स उमेश शेवाळे यांना पसंत पडले. आणि त्यांनी आपल्या घरातली बेडरूम अशीच साकारली. छोटी जागा, त्यामुळे बेड ठेवल्यानंतर साईड टेबल ठेवायलाही जागा उरत नाही. अशावेळी या कमी जागेतच साईड टेबल सह ड्रेसिंग टेबल ही बसेल अशी रचना केली. बेडरूम मध्ये असणारे बाथरूम ही इंटेरियर डिझाइनिंग चा एक उत्तम नमुना बनला. तसेच अनेक वेळा बेडमध्ये च काही सामान बसेल अशी रचना असते. मात्र ते सामान काढायचे म्हटले की थोडे शारीरिक कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट टाळण्यासाठी तिने हायड्रोलिक बेड ची रचना केली. तिने बनवलेला हा हायड्रोलिक बेड अनेकांनी आपल्या घरीं तयार करून घेतला आहे. अशाच पद्धतीने आदर्श फॅक्‍टरी कशी असावी याचा नमुना या विद्यार्थिनींनी तयार केला. फॅक्‍टरीत होत असलेला आवाज केबिन पर्यंत येऊ नये. तसेच साऊंड प्रुफ रूमसह अनेक बदल या फॅक्‍टरीमध्ये केले. 

याचप्रमाणे सिऱ्या वर्षात शिकणारी अवंती प्रभूआजगावकर हिने देवघर आणि टीव्ही एकाच फर्निचरमध्ये आणले आहे. तिने बनवलेले हे फर्निचर नम्रता ठाकूर यांनी आपल्या घरी नेले. कोकणातील डॉ. गोगटे यांनी वन बीएचके फ्लॅट घेतला. या फ्लॅटमध्ये त्यांना स्वतःचे क्‍लीनिक सुरू करायचे होते. मात्र जागेच्या उपलब्धतेनुसार सर्वच गोष्टी समाविष्ट होत नव्हत्या. यावर अवंतीने त्यांना सल्ला देत कमी जागेत क्‍लिनिकच्या सर्व रचना तयार करुन दिल्या. यासोबत झाडा सोबत लटकणारे जडीबुटी हे वॉल पेंटिंग ही एका भिंतीवर सजवले. सध्या घर, फ्लॅट, हॉटेल किंवा कॅफे डिझाईन करताना थ्री डी आर्ट ला पसंदी मिळते. हेच ओळखून या विद्यार्थिनींनी थ्री डी डिझाईन्स ही इंटेरिअर डिझाइनिंग मध्ये वापरल्या. गारगोटी रोडवर नव्याने होत असलेल्या कॅफेचे डिझाइनही अवंती सध्या करत आहे. 

लॅंडस्केप डिझाईनिंग 
घर किंवा ऑफिस चे सौंदर्य वाढवायचे असेल तर सुंदर गार्डन ची रचना केली जाते. ही रचना कशी असावी तसेच कोणत्या रचनेमुळे घराचे सौंदर्य आणखी वाढेल याचा सल्ला देत लॅंडस्केप डिझाईनिंग या विद्यार्थिनी करू लागल्या आहेत. 

उपलब्ध जागेत घराचे सौंदर्य कसे वाढवायचे याचा धडाच या अभ्यासक्रमातून आम्ही विद्यार्थिनींना देतो. पहिल्या वर्षापासून त्या आपले कौशल्य वापरून नवनवीन संकल्पना तयार करत असतात. त्याला अनेकांची पसंती मिळते. ऑर्डर सही मिळतात. त्यांच्या या स्टार्ट ला सर्व शिक्षकांचे मार्गदर्शनही मिळते. 
- आर्किटेक्‍ट प्रा. अमर मेस्त्री, विभाग प्रमुख इंटेरियर डिझाइनिंग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT