Interior designer young woman and tea pot ... 
कोल्हापूर

Video - थक्क करणारा तिचा प्रवास...! इंटेरियर डिझायनर तरुणी अन्‌ चहाची टपरी... 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : रेणू मंदार कुंभार-पाटील बॅचलर इन इंटेरियर डिझायनिंगची विद्यार्थिनी. आर्किटेक्‍टची पदवी मिळविल्यावर तीन हजार रुपयांवर तिने घाम गाळला. कुटुंबाचा खर्च चालविण्यासाठी मिळणारे वेतन तोकडे पडले. मग आयुष्याला "यू टर्न' देऊन तिने चहाची टपरी सुरू केली. चहाची तल्लफ भागवणारी तिची टपरी काही दिवसांतच फेमस झाली. "तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची...,' या वळणावरची तिची ही प्रेरणादायी कहाणी. 

रामानंदनगरातल्या खंडोबा देवालयामागे रेणूचे घर. महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ती दहावीपर्यंत शिकली. न्यू कॉलेजमधून तिने बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून धडे गिरवले. आई सुनीता यांची शिवाजी विद्यापीठाच्या मार्गावरील कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार चौकात खाद्यपदार्थांची टपरी होती. रेणू आईला मदत करण्यासाठी तेथे यायची. बारावीनंतर तिने सायबरमध्ये बॅचलर इन इंटेरियर डिझायनिंगसाठी प्रवेश घेतला. तेथून टपरीचे अंतर जवळ असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही ती आईला मदतीसाठी धावायची. 

पदवीनंतर रेणूचे लग्न झाले. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी तिने आर्किटेक्‍टचे काम करण्यास सुरवात केली. 

महिन्याकाठी मिळणाऱ्या तीन हजार रुपयांत घरखर्च भागायचा नाही. पतीला मदत करण्यासाठी तिने टपरीवर हातभार लावण्याचे ठरविले. आर्किटेक्‍टचे शिक्षण घेऊन तिने चहा टपरीवर काम करणे कुटुंबीयांना मान्य नव्हते. रेणू मात्र या व्यवसायातल्या करिअरला आकार देण्यासाठी थांबायला तयार नव्हती. लहान बाळाला घेऊन ती टपरीवर येऊन काम करू लागली. अवघ्या काही दिवसांतच तिचा चहा परिसरात फेमस झाला. गॅसवर तासन्‌ तास उकळणारा चहा तिच्या टपरीवर पाहायला मिळत नाही. ऑर्डर झाल्यावरच चहा व कॉफी गॅसवर उकळी घेते. चहा व कॉफीची तल्लफ भागविण्यासाठी येणारे ग्राहकही ठरलेले आहे. 

वेध भरारीचे 
रेणूच्या चहा, कॉफीची चव न्यारी आहे. सुरवातीला तिला स्प्रिंग पोटॅटो, फ्रेंच फ्राईज, बर्गर कसा करायचा, हे माहीत नव्हते. मित्र-मैत्रिणींच्या कॅफेवर जाऊन तिने त्याबाबतची माहिती घेतली. अनेक पदार्थ टेस्ट केले. ते कसे तयार करायचे, याचे प्रयोग तिने घरी सुरू केले. हे पदार्थ ती आज उत्तम बनवते. या व्यवसायात तिला आता भरारी घ्यायची आहे. 

शिक्षण तुम्हाला दिशा दाखवते; मात्र एखादी पदवी घेतल्यावर तुम्ही त्यातच करिअर करावे, असे नाही. तुम्ही जे काम आनंदाने कराल त्यात करिअर करता आले पाहिजे. स्वत:मधील आत्मविश्‍वास उंचावत राहिला तर खूप काही चांगले घडू शकते. 
- रेणू कुंभार-पाटील (आर्किटेक्‍ट तरुणी) 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT