कोल्हापूर

अंतर्गत परीक्षा, पहिल्या सत्रावर गुण निश्‍चिती

प्रतिनिधी

कोल्हापूर ः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठीय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. मात्र, या दोन्ही वर्षांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत परीक्षा आणि प्रथम सत्रातील गुणांवरूनच अंतिम निकालपत्रक बनविण्यात येणार आहे. अंतर्गत परीक्षेतील 50 टक्के गुण, तर प्रथम सत्रातील 50 टक्के गुण ग्राह्य धरले जातील. 
लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यापीठीय परीक्षा पुढे गेल्या. या परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील कुलगुरूंच्या समितीने परीक्षांचे नियोजन केले. यात पदवीच्या पहिल्या, दुसऱ्या वर्षांची परीक्षा रद्द करण्यात आली; तर तिसऱ्या वर्षाची परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. ही परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. असे असले तरी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी त्या वर्षाचे अंतिम गुणपत्रक द्यावेच लागेल. त्यामुळे हे मूल्यांकन कसे होणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. महाविद्यालयांनी वर्षभरात घेण्यात आलेल्या अंतर्गत परीक्षेचे 50 टक्के गुण आणि प्रथम सत्रातील परीक्षेचे 50 टक्के गुण ग्राह्य धरून अंतिम गुणपत्रिकेतील गुण दिले जातील.


पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यापीठीय परीक्षा जरी रद्द झाली असली. तरी अंतिम गुणपत्रक बनविले जाईल. यात अंतर्गत परीक्षा, प्रथम सत्राची परीक्षा यांचे गुण ग्राह्य धरले जातील. याबाबतचा निर्णय घेऊन लवकरच अंतिम गुणपत्रकाबाबत महाविद्यालयांना सूचना दिल्या जातील. 
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ 

एटीकेटीची परीक्षा होणारच 
पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात ज्यांना एटीकेटी मिळाली आहे, त्यांना अनुत्तीर्ण झालेल्या विषयाची परीक्षा द्यावीच लागणार आहे. या परीक्षा महाविद्यालय सुरू झाल्यावर घेतल्या जातील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

E-scooter: बॅटरी काढा, घरात नेऊन चार्ज करा! BGauss OoWah इलेक्ट्रीक स्कूटर बाजारात; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स! 

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

SCROLL FOR NEXT